108 पदांच्या मंजुरीसाठी नगरविकासमंत्र्यांना साकडे

108 पदांच्या मंजुरीसाठी नगरविकासमंत्र्यांना साकडे

सटाणा । प्रतिनिधी

सटाणा नगर परिषदेचा आकृतीबंध मंजूर होऊन तब्बल 13 वर्षे कालावधी पूर्ण झाला असून नगर परिषदेतील एकूण 108 पदे व्यपगत झाली आहेत. नगर परिषदेकडे कमी मनुष्यबळ असल्याने विकासकामांवर विपरित परिणाम होत आहे. सुधारित आकृती बंधानुसार 108 पदे मंजूर करावी, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.

सन 2005 नुसार परिषदेचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. गत 13 वर्षांच्या कालावधीत आस्थापनेवरील अनेक पदे विविध कारणास्तव रिक्त होऊन पदभरती होऊ शकली नाही. यामुळे सनपाकडे अपूर्ण मनुष्यबळ आहे. वाढती वसाहत, लोकसंख्येतील वाढ, नागरी सोयीसुविधांवर पडणारा ताण तसेच विद्ममान आकृतीबंधातील अटीमुळे रिक्त होणारी पदे भरता येत नसल्याने आस्थापनेवरील वर्ग 3 ची 41 पदे व वर्ग 4 ची 67 पदे अशी एकूण 108 पदे व्यपगत झाली आहेत.

2018 मध्ये शासनास सदर भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तालय नाशिक यांच्यामार्फत सदर प्रस्ताव संचालक नगर विकास प्रशासन मुंबई यांना सादर करण्यात आल्याचे स्पष्ट करीत मोरे यांनी सद्यस्थितीत करोना काळात सेवकांंवर कामाचा ताण पडून कार्यक्षमतेवर परिणाम हेात असल्याने तातडीने नवीन पद भरतीस मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com