वस्त्रोद्योग उर्जितावस्थेसाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

वस्त्रोद्योग उर्जितावस्थेसाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातील वस्त्रोद्योग व्यवसायास (Textile business) उर्जितावस्था लाभण्यासाठी विविध उपाययोजना करत त्यासाठी भरीव निधीची (fund) तरतूद करावी, अशी मागणी भाजपा (bjp) उद्योग आघाडीचे प्रदेश समन्वयक रविष मारू (ravish maru)

यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad) यांच्याकडे केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेवून केंद्राच्या आगामी अर्थसंकल्पात (budget) तरतूद केली जाईल, असे आश्वासन ना.डॉ. कराड यांनी दिले आहे.

भाजपाच्या मुंबई प्रदेश कार्यालयात नुकताच मंत्री व कार्यकर्ता भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेश समन्वयक रविष मारू व यंत्रमाग असोसिएशनचे (Machine Spinning Association) नेते अ‍ॅड. मुजीब मोमीन (Adv. Mujib Momin) यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट घेवून शहरातील वस्त्रोद्योगाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करून वस्त्रोद्योग व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या.

त्यात कॉटन (Cotton) व यार्न निर्यातीवर (Yarn Export) बंदी घालावी, तयार कापड व रेडीमेड गारमेंटच्या (Fabrics and readymade garments) निर्यातीसाठी (Export) पोषक वातावरण निर्माण करावे, विणकरांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन टफसारख्या (Technology Upgradation Tough) योजनांना प्राथमिकता देऊन त्या सहज आणि सोप्या बनविण्याचा प्रयत्न व्हावा, चायनामेड स्वस्त कपड्यांच्या उत्पादनावर कर लावून त्यास प्रतिबंध करण्यासाठी अ‍ॅन्टीडंपींग ड्युटी (Anti-dumping duty) लावावी,

गत अनेक वर्षांपासून कामगारांच्या निवारा व आरोग्याची अवस्था दयनीय असून त्यासाठी उपाययोजना करावी, जीएसटी (GST) वाढीमुळे अनेक यंत्रमाग बंद होण्याचा धोका असल्याने कॉटन कपड्यावर फक्त पाच टक्केच जीएसटी आकारल्यास कामगारांचा रोजगार वाचेल, वस्त्रोद्योग विभागाच्या योजना किचकट असून त्या अशिक्षित विणकर कामगारांना समजत नसल्याने सहज व सोप्या करण्याकडे लक्ष द्यावे आदी उपाययोजनांवर भर दिल्यास निश्चितच यंत्रमाग व्यवसायास चांगले दिवस येतील, असे मारू व अ‍ॅड. मुजीब यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर उपस्थित होते. ना. कराड यांनी उपरोक्त मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, अशी ग्वाही दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com