नाशिक कृउबाची निवडणूक घेण्याची मागणी

सहकारमंत्र्यांना साकडे
नाशिक कृउबाची निवडणूक घेण्याची मागणी

पंचवटी । वार्ताहर Panchavati

करोना Corona विषाणूच्या संसर्गामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या APMC Nashik निवडणुकीस Election दिलेली मुदतवाढ संपुष्टात आली असून, लवकरात लवकर निवडणूक प्रक्रिया घ्यावी, अशी मागणी सभापतींसह संचालक मंडळाने सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील Minister of Co-operation and Marketing Balasaheb Patil यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाने मंत्री महोदयांची भेट घेतली.

नाशिक बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ गेल्या वर्षी दि. 19 ऑगस्ट 2020 रोजी संपुष्टात आला होता. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार व पणन विभागाच्या वतीने संचालक मंडळास पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच दि. 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

तसा प्रस्तावदेखील जिल्हा उपनिबंधकांनी शासनास सादर केला होता. मात्र, करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच होता. त्यामुळे करोनाचा संसर्ग आणखी वाढू नये आणि करोना परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी शासनाने पुन्हा दि.5 जानेवारी 2021 रोजी आदेश काढला आणि दि. 20 फेब्रुवारी 2021 पासून पुढील सहा महिन्यांकरिता मुदतवाढ दिली.

दुसर्‍यांदा दिलेली ही मुदतवाढही 19 ऑगस्ट 2021 रोजीच संपुष्टात आली आहे. त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर व संचालक तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, विश्वास नागरे आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.14) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे आश्वासन दिले.

दोन वेळा मुदतवाढ

बाजार समिती निवडणुका 20 ऑगस्ट 2015 झाल्या होत्या. 19 ऑगस्ट 2020 संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली होती. सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग 24 सप्टेंबर 2020 रोजीच्या पत्रनुसार 20 ऑगस्ट 2020 ते 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ. त्यानंतर पुन्हा सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग पुन्हा 5 जानेवारी 2021 च्या पत्रानुसार 20 फेब्रुवारी 2021 ते 19 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com