जानोरी । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील शेतकर्याला वीजबिल भरून देखील मुजोर अधिकार्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केले हे नक्कीच निंदनीय असून अशा मुजोर अधिकार्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी ऊर्जामंत्र्यांकडे खासदार डॉ. भारती पवार यांनी केली .

संबंधित अधिकारी बोरकर यांनी शेतकर्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संबंधित अधिकार्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणी सर्वपक्षीयांनी केली आहे. याची माहिती दिंडोरी लोकसभेच्या खा. डॉ. भारती पवार यांना समजताच त्यांनी तत्काळ ऑडिओ क्लिप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवून अशा मुजोर अधिकार्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

यावर ऊर्जामंत्र्यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकार्यावर लवकरात लवकर कारवाई होईल, अशी ग्वाही दिली असल्याची माहिती खासदार डॉ. पवार यांनी दिले आहे.

संबंधित अधिकार्यांवर तत्काळ कारवाई न करता जर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर नक्कीच ते खपवून घेतले जाणार नाही. अवकाळी पाऊस तसेच करोना कालावधीत शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मेटाकुटीला आले असताना अशा मुजोर अधिकार्यांच्या वागणुकीमुळे शेतकर्यांनी जगावे कसे, हा प्रश्न समोर पडला आहे.