दुभाजकाचे काम थांबवण्याची मागणी

दुभाजकाचे काम थांबवण्याची मागणी
USER

सातपूर । प्रतिनिधी Satpur

त्र्यंबकरोड (Trimbak Road) ते बारदान फाटा - मोतिवाला कॉलेज दरम्यान रस्त्यावरील रस्ता दुभाजकचे (road divider) काम दोषयुक्त असल्याचा आरोप करीत मनपा आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांना निवेदन (memorandam) देण्यात आले.

नाशिक मनपा (Nashik Municipal Corporation) सातपूर (satpur) विभागातील त्रंबकरोड ते बारदान फाटा- मोतिवाला कॉलेज दरम्यान रस्ता दुभाजकाचे काम सुरु आहे . परंतु सदरच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी करावी तो पर्यंत कामाला स्थगिती देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या मार्गावर महेंद्रा कंपनी गेट, पार्थ पॅलेस हॉटेल, कार्बन नाका, सात माऊली चौक हा अत्यंत गजबजलेला परीसर असून, या मार्गावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहेत.

या दुभाजकाच्या कामामुळे या भागातील रस्तालगत व्यवसाय करणार्‍यां दुकानदारांना रस्ताच उरलेला नाही. कार्बन नाका व महिंद्रा (mahindra) गेट लगतच्या बाजूस ट्रक व कंटेनर (Trucks and containers) उभे राहत असल्याने यापूर्वीच वाहतूकीस अडथळा (Obstruction of traffic) निर्माण होत होता. तसेच सध्या ज्या भागात रस्ता दुभाजकाचे काम सुरु आहे त्या ठिकाणी आता रस्ताच अस्तित्वात नाही.

प्रथमतः रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक असतांनाही हेतूपूरस्सर रस्ता दुभागाजकाचे काम सुरू करुन मोठ्या प्रमाणात वाहतूकीस अडथळा निर्माण केला आहे. सद्यस्थितीत अत्यंत चुकीच्या पध्दतीने सुरु असलेल्या या रस्ता दुभाजकाच्या कामाची पाहणी करावी व तोपर्यंत सदरच्या कामास स्थगिती देण्यात यावी. अशी विनंती गायकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी करण गायकर, शिवसेना (shiv sena) सामाजिक कार्यकर्ता सविता गायकर, प्रमोद जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सदाशिव माळी, नवनाथ शिंदे, साहेबराव जाधव, बाळा जारे, महेश आहेर, सम्राट सिंग, अविनाश गायकर, प्रितेश पाटील उपस्थित होते..

काही नगरसेवकांच्या मागणीनुसार अमृत गार्डन ते बारदान फाटा या रस्त्यावर दुभाजकाचे काम सुरू आहे परंतु हे काम चुकीच्या पद्धतीने होत आहे. निवडणुका तोंडावर आहे म्हणून स्वतःचे काम दाखवण्याचा प्रयत्न काही नगरसेवकांचा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये अनेक अपघात होऊन काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. हे काम त्वरित थांबवावे आणि हे करून सुद्धा जर आमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही तर जनांदोलन या रस्त्यावर केले जाईल.

करण गायकर, संस्थापक अध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com