आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

देवळालीगावचा महत्वाचा आठवडे बाजार त्वरित सुरु करण्याची मागणी शेतकरी व व्यावसायिकांनी केली आहे.

महापालिकेचे प्रभारी विभागीय अधिकारी निलेश साळी यांना कैलास ढोले, गोविंद शिरोडे, राजेंद्र ढोले, सत्तार तांबोळी, अजय गायकवाड, दिपक गायकवाड, किरण ढोले, राहुल ढोले, संजय व्यवहारे, दिलीप व्यवहारे, अंकुश कारडे, किशोर कोरडे, निलेश मोरे आदींनी निवेदन दिले.

लॉकडाउनमुळे हा बाजार बंद ठेवण्यात आला होता. आता विविध व्यवसाय तसेच इतर बाजार खुले झाले असतानाही येथील आठवडे बाजार बंदच ठेवण्यात आला आहे. या बाजारात शिंदे, पळसे, विहीतगाव, पांढुर्ली, लहवित, सिन्नर, नाशिकरोड परिसरातील शेतकरी, व्यावसायिक व ग्राहक येतात.

सात महिन्यांपासून बाजार बंद आहे. त्यामुळे या शेकडो लोकांची उपासमार होत आहे. नाशिकरोडचा उड्डाणपूल, जेलरोड, नीलगिरी बाग आदी ठिकाणचे मोठे बाजार सुरु आहेत.

देवळालीगावातील आठवडे बाजार त्वरित सुरु केल्यास दुर्गा उद्यान, मीना बाजार, राजेंद्र कॉलनी, अण्णा हजारे मार्ग, शिवाजी पुतळा, जेलरोड, नाशिकरोड उड्डाणपुल येथील बाजारातील गर्दी कमी होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com