नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

मनपा विभागीय कार्यालयातील श्री शिवछत्रपती सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाची अभ्यासिका सुरू करण्यात यावी यासाठी माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने विभागीय अधिकार्यांना निवेदन दिले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून नवीन नाशिक विभागीय कार्यालयात सुरू असलेली अभ्यासिका बंद करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत नवीन नाशकातील कामगार वसाहतीतीलच विद्यार्थी येत असतात. अभ्यासिका बंद असल्याने आता त्यांना अभ्यासासाठी जागाच नसल्याने ही अभ्यासिका सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मुभा द्यावी, अशीही मागणी यात करण्यात आली आहे. सदरचे निवेदन विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांना देण्यात आले असून यावेळी मंडळाचे अध्यक्ष मामा ठाकरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन नाशकमधील नागरिकांची परिस्थिती आणि घरांची जागा याचा विचार करून ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अभ्यासिका बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नियमांची अंमलबजावणी करून अभ्यासिका सुरू करण्याची परवानगी मिळावी हीच अपेक्षा आहे.

मामा ठाकरे, माजी नगरसेवक