रेल्वेसंलग्न बस सुरू करण्याची मागणी

बस सेवा (File Photo)
बस सेवा (File Photo)

विंचूर। वार्ताहर | Vinchur

पंचवटी रेल्वे (Panchavati Railway) व मनमाड स्पेशल (Manmad Special) या दोन रेल्वे गाड्यांना (Railway trains) सलग्न असेलेली व सध्या बंद करण्यात आलेली

बससेवा (bus service) पूर्ववत केव्हा होणार? असा संतप्त विंचूर (vinchur) व लासलगाव (lasalgaon) परिसरातील नागरिक विचारत आहेत. त्यामुळे सदर बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.

पंचवटी एक्स्प्रेस (Panchvati Express) व मनमाड स्पेशल (Manmad Special) या दोन रेल्वे गाड्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळेत लासलगाव रेल्वे स्थानक (Lasalgaon Railway Station) ते विंचूर अशी बससेवा पूर्वीपासून सुरु होती. मात्र करोना काळात बंद करण्यात आलेली ही बससेवा (bus service) आजतागायत बंद आहे.

पंचवटी एक्स्प्रेस व मनमाड स्पेशल या दोन रेल्वे गाड्यांनी विंचूर, लासलगाव, देवगाव, डोंगरगाव, नांदगाव, भरवस, वाहेगाव येथील नागरिक, व्यापारी व विद्यार्थी (students) लासलगाव-नाशिक, मुंबई-लासलगाव असा प्रवास करत असतात.

या दोन्ही रेल्वे गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी सदर बससेवा (bus service) खुप गरजेची असल्याने परिसरातील नागरिकांच्या वतीने वेळोवेळी लासलगाव आगार प्रमुखांशी संपर्क साधून तसेच तोंडी व निवेदनाद्वारे (memorandum) बंद असलेली बससेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आगार प्रमुखांकडून कधी आषाढी एकादशीमुळे गाड्या पंढरपूरला गेल्या तर कधी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला (tryambakeshwar) गेल्यामुळे सध्या गाड्या उपलब्ध नाही असे उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेली जाते.

लासलगाव आगार प्रमुखांची आषाढी वारी व त्र्यंबकेश्वरची फेरी अजून संपलेली दिसत नाही. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (Maharashtra State Transport Corporation) ब्रीदवाक्य असतांना प्रमुख कोणाचे हित जोपासत आहेत असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

तत्कालीन आगार प्रमुखांनी याकडे लक्ष दिले नाहीच मात्र नव्याने रुजू झालेल्या आगार प्रमुखांनी तरी याकडे गांभिर्याने लक्ष घालून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी विंचूर, नांदगाव, डोंगरगाव, सुभाषनगर, विष्णूनगर, हनुमाननगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com