आगरताळासाठी किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी

आगरताळासाठी किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेली किसान एक्स्प्रेस Kisan Exspress आगरताळासाठी Agartala सुरू करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या MNS वतीने नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे Nashikroad Railway Station वाणिज्य निरीक्षक राकेश पलाविया तसेच स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या नाशिक जिल्हा शिष्टमंडळाने रेल्वे प्रबंधक मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये भेट घेऊन शेतकरी बांधवांच्या विविध मालवाहतुकीच्या प्रश्नावर चर्चा करताना वर्तमान स्थिती आणि वातावरण पाहता नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला कांदा आणि इतर शेती उत्पादने याबाबत खूप चिंतेत आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपासून होत असणार्‍या बेमोसमी पावसामुळे शेतमाल आणि उत्पादने देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे विभागाकडून शालिमार किसान स्पेशल एक्स्प्रेस आगरताळासाठी सुरू केल्यास आम्ही रेल्वेने 380 मेट्रिक टन माल देण्याची व्यवस्था करू, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी सहकार सेनेचे उपाध्यक्ष रोहन देशपांडे, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे, राकेश परदेशी, स्वागता उपासनी, विशाल साळवे, नीलम भुसारी, अक्षरा घोडके, विल्सन साळवी, गौरव शिंपी, बाळा गोसावी, अनिल वाघचौरे, दिगंबर दराडे, पराग भुसारी, दिनेश विश्वकर्मा, मयूर रत्नपारखी, सोनू आंधळे, सूरज खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com