गोदाकाठ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी

गोदाकाठ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी

म्हाळसाकोरे। वार्ताहर Mhalsakore

गेल्या दोन वर्षापासून करोना (Corona) प्रादूर्भावामुळे तालुक्याच्या गोदाकाठ (Godakath) भागात फिरणार्‍या सिन्नर (Sinnar) आगाराच्या अनेक बस (Bus) बंद असून यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी (School, college students) व नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बंद असलेल्या या बस पूर्ववत सुरू कराव्या अशी मागणी होत आहे.

तालुक्याच्या गोदाकाठ परिसराची मुख्य वाहिनी असलेल्या बसगाड्या सध्या बंद असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रवासावेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षापासून सिन्नर ते कोळपेवाडी (Sinnar to Kolpewadi) ही बस बंद आहे. कोपरगावच्या उत्तर, पश्चिम भागातील तीन तालुक्यांना जोडून मुख्य वाहिनी असणार्‍या या बसने शेतकरी (Farmers), शेतमजूर, चाकरमाणी, विद्यार्थी, व्यवसायिक प्रवास करतात. साहजिकच परिवहन महामंडळाला (Transport Corporation) या बस फेरीतून मोठे आर्थिक उत्पन्न मिळते.

मात्र करोना प्रादूर्भावामुळे ही बससेवा बंद (Bus service closed) होती. आता करोना प्रादूर्भाव ओसरल्यानंतरही ही बससेवा (Bus service) अद्यापपर्यंत सुरू झाली नाही. त्यामुळे सिन्नर (Sinnar) व निफाड (Niphad) तालुक्यातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बस प्रमाणेच सिन्नर-करंजी व लासलगाव-सिन्नर या बसच्या फेर्‍या देखील वाढवणे गरजेचे आहे. करोना प्रादूर्भावापूर्वी या बसगाड्या दिवसातून तीन ते चार फेर्‍या मारत असे. परंतु त्यांच्या फेर्‍या आता कमी झाल्या आहे.

या बसच्या फेर्‍या बंद असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शाळा (School), महाविद्यालये (Colleges), आठवडे बाजार व या परिसरातील प्रमुख बाजारपेठांवर झाला आहे. त्यामुळे लासलगाव व सिन्नर आगाराने या परिसराला वरदान ठरणार्‍या व हिवरगाव, म्हाळसाकोरे, खानगावथडी, तारूखेडले, तामसवाडी,

करंजी, ब्राम्हणवाडे, नांदूर, दिंडोरी, शिवरे, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, रूई, देवगाव, सोमठाणे, वडांगळी, सांगवी, वडगाव, कोळपेवाडी, चास, दहीवडी आदी गावातून धावणार्‍या बस पूर्ववत सुरू करून या परिसरातील दळण-वळणाला चालना द्यावी. तसेच विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.