वावी । वार्ताहर Vaviसातबारा उतार्यावरील दुरुस्ती करण्यासाठी तलाठी कार्यालयाच्या पायर्या झिजवून शेतकरी कटांळले आहेत .वर्षानंतरही दुरुस्ती होत नसेल तर ऑनलाईन सातबारा पध्दतच मोडीत काढा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.शासनाने सातबारा ऑनलाइन देण्याची प्रक्रिया सुरू करून काही वर्ष झाली आहेत. मात्र, ही ऑनलाईन नोंदणी करतांना अनेक चुका झाल्या आहेत. ही नोंदणी माणसांनीच केली असल्याने चुका झाल्या तर समजण्यासारखे आहे. त्यामुळे हे ऑनलाईन उतारे काढल्यानंतर सात बाराच्या उतार्यावर अनेक चुका झाल्या असल्याचे अनेक शेतकर्यांना दिसून आले.अनेकांनी संबंधीत तलाठ्याची भेट घेऊन झालेल्या चुका त्यांच्या नजरेस आणून दिल्या. त्यावर तसा अर्ज करा. काही दिवसातच चुकांची ऑनलाईन दुरुस्ती करु असे आश्वासन तलाठ्यांनी दिले. त्याप्रमाणे अनेक शेतकर्यांनी आपले अर्जतलाठ्यांकडे सादर केले. जूने हस्तलिखीत उतारेही माहितीसाठी सोबत जोडले. मात्र, अनेक चकरा मारल्यानंतरही तलाठ्यांनी ऑनलाईन उतार्यांमधील चुका दुरुस्त केल्या नाहीत. जसा सातबारा ऑनलाइन सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत सातबारावरील दुरुस्त्या जशाच्या तशाच आहेत.अनेक ठिकाणच्या तलाठ्यांच्या बदल्यादेखील झाल्या. मात्र, त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करण्याकडे गांभीर्याने बघीतले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्यांसमोरील समस्या वाढल्या आहेत. जुना सातबारा समोर असताना, त्यावर प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून ऑनलाईन सातबारा उतार्यावर दुरुस्ती करणे शक्य आहे.मात्र, संबंधित केवळ चालढकल करत असल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. ऑनलाईन उतार्यांमध्ये अनेक चूका असल्याने कर्ज प्रकरण, शासकीय सवलती किंवा योजनांचा लाभ घेण्यात शेतकर्यांना अडचणी येत आहेत. महसूल विभागाने तात्काळ दुरुस्तीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑनलाईन उतार्यावरील चुका दुरुस्त कराव्यात व शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.सातबारा ऑनलाइन झाला, तेव्हापासून त्यात झालेल्या चूका दुरुस्त करणे बाकी आहे. याबाबत त्याचवेळी तलाठ्यांकडे अर्जही दिला होता. आज अनेक महिने झाले. तलाठी कार्यालयात अनेक चकरा मारल्या. मात्र, अजूनही दुरुस्ती झालेली नाही. ऑनलाईन नोंद करतांना आमची कुठलीही चूक झालेली नसतांना हेलपाटे मारण्याची शिक्षा आम्हाला देण्यात आली आहे. तहसिलदार साहेबांनीच यात लक्ष घालावे व झालेल्या चूका लवकरात लवकर दुरुस्त करुन शेतकर्यांंना दिलासा द्यावा.नाना भोसले, शेतकरीसध्या सिन्नर तालुक्यात जवळपास 1200 तक्रारी आहेत. जर हस्तलिखित उतार्यावरून दुरुस्ती करावयाची असेल तर अवघ्या दोन दिवसात त्या दुरुस्त्या करणे शक्य आहे. तफवातीच्या दुरुस्त्या असतील तर संबंधित शेतकर्याने तसा अर्ज करून आपली दुरुस्ती करून घ्यावी. याबाबत मी स्वतः लक्ष घालून तात्काळ दुरुस्त्या करण्याचे आदेश संबंधीताना देतो.राहूल कोताडे, तहसीलदार