नाशिक-मुंबई महामार्गावरील जीवघेणे गतिरोधक काढावेत

नाशिक सिटिझन्स फोरमची ‘न्हाई’कडे मागणी
नाशिक-मुंबई महामार्गावरील जीवघेणे गतिरोधक काढावेत
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक-मुंबई महामार्गाच्या Nashik- Mumbai Highway दूरावस्थेमुळे जीवघेण्या अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात अनधिकृत गतिरोधकांची speed Breakers on Highway भर पडली आहे. ‘नाशिक सिटिझन्स फोरम’ने ‘Nashik Citizens Forum’ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण National Highways Authority of India अर्थात ‘न्हाई’चे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील सर्वच गतिरोधकांबाबत योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी मागणी नाशिक सिटीझन्स फोरमने ‘न्हाई’कडे केली आहे.

अनधिकृपणे गतिरोधक उभारणे हे महामार्ग निर्मितीच्या मूळ उद्देश्यालाच हरताळ फासणारे असल्याचे खुद्द महामार्ग मंत्रालयाचेच म्हणणे आहे.ते दर्शविणारा एक अध्यादेशही फोरमने या तक्रारीसोबत सादर केला आहे.

देशातील दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरील नाशिक ते मुंबई दरम्यान रस्त्याची दूरावस्था गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली आहे. त्यासंदर्भात नाशिक सिटीझन्स फोरमने वेळोवेळी विविध स्तरांवर दाद मागण्याचे प्रयत्न केले आहेत. मा.उच्च न्यायालयानेही या समस्येची दखल घेत निर्देश दिले आहेत.

याबाबत नाशिक सिटीझन्स फोरमने खेद व्यक्त करणारे पत्र ‘न्हाई’ला दिले आहे. त्यानुसार नाशिक-मुंबई महामार्गाच्या खराब स्थितीमुळे एकीकडे अनेक अपघातप्रवण जागा तयार झाल्या असताना त्यात आता विविध ठिकाणच्या गतिरोधकांचीही भर पडली आहे. विशेषतः कसारा घाट परिसरात अनेक ठिकाणी तयार केलेले गतिरोधक हे जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरण्याची व्यक्त करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महामार्गावरील गतिरोधकांविरोधात यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट अशी भूमिका घेतलेली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने 1996, 1998, 2000, 2001,2002 साली परिपत्रकेही काढलेली आहे. या परिपत्रकांचा संदर्भ देत महामार्गावरील गतिरोधक काढण्याच्या संदर्भातील दि. 11 एप्रिल 2016 रोजीचे परिपत्रक फोरमने न्हाई‘ला सादर केलेलेे आहे.

वेगवान आणि विनाअडथळा वाहतूक व्हावी हाच महामार्ग तयार करण्याचा मुळ उद्देश्य असतो.त्या उद्दशाला हरताळ फासण्याचे कामच हे गतिरोधक करत आहेत. अतिशय अपरिहार्य जागांवरही गतिरोधक नव्हे तर रम्बल स्ट्रीप्स बसवावेत व त्यासाठीही सक्षम अधिकार्‍यामार्फत निर्धारित प्रक्रियेद्वारे सुनिश्चित केल्या जाव्यात, असे मंत्रालयाचे स्पष्ट आदेश आहेत. या अनूषंगाने नाशिक-मुंबई महामार्गावरील सर्वच गतिरोधकांबाबत योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी मागणी नाशिक सिटीझन्स फोरमने ‘न्हाई’कडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com