रासायनिक खतांच्या किमती कमी करा

- खासदार डॉ. भारती पवार यांची केंद्राकडे मागणी
रासायनिक खतांच्या किमती कमी करा

नाशिक । प्रतिनिधी

शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्या,अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रासायनिक खाद्य राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असून येथील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोना महामारीच्या विळख्यात सापडून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे आमचा शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.त्यातच सध्या शेतीसाठी खतांची गरज असून या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे.

त्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर या खतांवरील किमती कमी कराव्यात व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी केंद्रीय रसायन खाद्य राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे खा. डॉ भारती पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

तसेच केंद्रीय मंत्रालयाशी फोनद्वारे संभाषण केले असता त्यांनी या मागणीवर योग्य व सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले असल्याचे खासदार डॉ. पवार यांनी सांगितले

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com