
नाशिक । प्रतिनिधी Nashik
रब्बी हंगामात Rabbi Season अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढवल्याने महागडी खते fertilizer घेणे शेतकर्यांना परवडणारे नाही. त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायनमंत्री मनसुख मांडवीय Union Minister for Fertilizers and Chemicals Mansukh Mandviya यांना पत्र लिहिले आहे.
मंत्री भुसे यांनी पत्रात म्हटले आहे की, रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडीयोग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकर्यांना परवडणारे नाही.
राज्यात अधिकाधिक अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकर्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात.
खतनिहाय दरवाढ
10:26:26- 1440 ते 1470 (1440 ते 1640). वाढ: 170 रुपये.
12:32:16- 1450 ते 1490 (1450 ते 1640) वाढ: 150 रुपये.
16:20:0:13 - 1075 ते 1250 (1125 ते 1250) वाढ: 50 रुपये.
अमोनियम सल्फेट: 875 (1000) वाढ: 125.
15:15:15:09 - 1180 ते 1450 (1375 ते 1450) वाढ:195