यूपीएससी, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कुलगुरुंना निवेदन
यूपीएससी, पुणे विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसोबत (UPSC) एकाच वेळी होणार्‍या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरूंना ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (All India Students Federation) वतीने विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे (Dr. Prashant tope) यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवेच्या तसेच इतर विभागांच्या पूर्व व मुख्य परीक्षा दि.१८ जुलै रोजी नियोजित आहेत. अभियांत्रिकी शाखेचे तसेच इतर पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थी युपीएससीसाठी अर्ज दाखल करत असतात.

विद्यापीठाच्या परीक्षा, लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी व इतर परीक्षा एकाच दिवशी असल्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे.

याची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने त्वरित अभियांत्रिकीसोबत विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी विनंती करण्यात आली.

याप्रसंगी एआयएसफचेे राज्याध्यक्ष विराज देवांग (Viraj Dewang), जिल्हाध्यक्ष अविनाश दोंदे, तल्हा शेख, अक्षय दोंदे, जयंत विजयपुष्प, प्रणाली मगर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com