कामगारांची थकित रक्कम द्या; अन्यथा उपोषण

कामगारांची थकित रक्कम द्या; अन्यथा उपोषण

निफाड । प्रतिनिधी Niphad

रासाका (Rasaka ) भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या परळी (जि. बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ( Vaidyanath Co-Op Sugar Factory )कामगारांचे 1 कोटी 28 लाख रुपये थकित देणे अद्यापपर्यंत दिले नसल्याने या कामगारांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde )यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याने दिवाळीपूर्वी रासाका कामगारांची थकित रक्कम द्यावे अन्यथा शेतकरी व कामगारांचे वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा कामगार युनियनच्या वतीने निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

प्रांत डॉ. अर्चना पठारे यांना कामगारांचे वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी (बीड) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि. काकासाहेबनगर (ता. निफाड) सन 2006 ते 2012 या सहा वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला होता. वैद्यनाथचा करार दि.30.6.2012 रोजी संपलेला असतानाही आजपर्यंत या कारखान्याने रासाका कामगारांची 1 कोटी 28 लाख रुपयांची देणी दिली नाहीत.

तसेच शेतकर्‍यांनी पुरविलेल्या उसाचे प्रतिटन 265 रु. प्रमाणे पैसे देणे बाकी आहे. थकित रकमेबाबत वेळोवेळी वैद्यनाथ साखर कारखाना, साखर आयुक्त तसेच शासकीय कार्यालयात अर्ज देवून मागणी केली. तसेच प्रत्यक्ष भेटी घेतल्या व वेळोवेळी उपोषणे, आंदोलने केली. असे असतानाही आमच्या रकमेबाबत कुणीही दखल घेतली नाही.

आज आम्ही हलाखीचे जीवन जगत असून आमच्या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी वैद्यनाथची थकित रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी अन्यथा शेतकरी व कामगारांच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर स्वाभिमानीचे सुधाकर मोगल, कामगार युनियनचे बळवंत जाधव, शिवराम रसाळ, अरुण कुशारे, सुभाष गायकवाड, सुधाकर धारराव आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com