ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी

रिपाइंतर्फे धडक मोर्चा
ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्यावरून वाद सुरू असतांना आता ओझर विमानतळाला( Ozar Airport ) कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी तर्फे आक्रमक भूमिका घेत धडक मोर्चा काढण्यात येवून एकात्मता चौकात निदर्शने करण्यात आली.......

प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन, गुरुकुमार निकाळे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हा मोर्चा आरपीआय भवन येथून काढला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने केली. शासनाने तातडीने ओझर विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे अन्यथा आगामी काळात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी यावेळी बोलतांना दिला.

शहरातील विविध मार्गावरून जावून हा मोर्चा एकात्मता चौकात आल्यानंतर येथे कार्यकर्त्यांनी कोण म्हणत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही यासह इतर घोषणा देत तीव्र निदर्शने केली. यावेळी मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात प्रमोद आहिरे, विलास आहिरे, दिनकर कांबळे, सुरेश शिंदे, अकिल शेख, प्रदीप घुसले, प्रशांत दराडे, नाना आहिरे, वसंत पगारे, टी.एच. कांबळे, सुरज आहिरे, शिरीष पगारे, कृष्णा पगारे, चंद्रमणी उबाळे, प्रदीप घुसले, मोजेश साळवे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी नाशिक जिल्हाच नव्हे तर राज्यासाठी योगदान दिले असून ते नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र आहे. त्यामुळे ओझर विमानतळाला त्यांचे नाव देण्याची आम्ही मागणी केली आहे. सदर मागणी शासनाने मंजूर करावी अन्यथा आरपीआयतर्फे आगामी काळात रिपाइंतर्फे( RPI ) संपुर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलने केले जातील

राजेंद्र अहिरे, नगराध्यक्ष, मनमाड

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com