
नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोना पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पुन्हा जोमाने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असली तरी कोव्हीशिल्ड लस उपलब्ध नसल्याने दहा हजार कोव्हिशिल्डची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु, अद्यापपर्यंत लस उपलब्ध झालेली नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनमधील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेताना महापालिकेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. सतर्कतेचा भाग म्हणून अत्यावश्यक सुविधांची जमवाजमव केली जात आहे. कोरोना भीतीने नागरिकांची पावले लसीचा बूस्टर डोस घेण्याकडे वळली आहे.
नागरिकांकडून कोव्हीशिल्ड लसीची मागणी केली जात आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे 18 हजार डोस शिल्लक आहेत. परंतु बहुतांश नागरीकांनी कोव्हीशिल्ड लस टोचली असल्याने त्यानुसार मागणी वाढली आहे. शहरात सरासरी 96 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.