करोना चाचणी शहरात ठेवण्याची मागणी

करोना चाचणी शहरात ठेवण्याची मागणी

निफाड । Niphad (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मागणीनुसार निफाड शहरात आ. दिलीप बनकर यांच्या प्रयत्नाने निफाड उपजिल्हा रुग्णालयात 60 बेडचे करोना रुग्णालय मंजूर झाले असून ऑक्सिजन लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

हे कोविड रुग्णालय झाल्याने निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेली रॅपिड टेस्ट व करोना प्रतिबंधक लसीकरणास बाधा निर्माण होणार असल्याने प्रशासनाने सदर सेवा बंद न करता व इतर गावात स्थलांतरीत न करता ही सेवा निफाड-पिंपळगाव रोडलगत असलेल्या जुना सरकारी दवाखाना येथे सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना संक्रमणात निफाड तालुका हॉटस्पॉट ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व आ. बनकर यांच्या प्रयत्नाने निफाड उपजिल्हा रुग्णालयात 60 खाटांचे करोना रुग्णालय सुरू करण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र तेथे सुरू असलेल्या रॅपिड टेस्ट व करोना प्रतिबंधक लसीकरणास बाधा निर्माण होणार आहे. म्हणून प्रशासनाने सदर सेवा जुना सरकारी दवाखाना येथे सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, निफाडचे माजी सरपंच बापू कुंदे, जिल्हा उपाध्यक्ष इरफान सय्यद, नगरसेवक किरण कापसे, दिलीप कापसे, जावेद शेख, दादा गांगुर्डे, निवृत्ती मेधने, बापू कापसे आदींच्या सह्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com