कॅन्टोन्मेन्टची नगरपालिकेत समावेश करण्याची मागणी

खा. गोडसेंचे राजनाथ सिंह यांना साकडे
कॅन्टोन्मेन्टची नगरपालिकेत समावेश करण्याची मागणी

देवळाली कॅम्प । वर्ताहर

कटक मंडळाकडे ( कॅन्टोन्मेन्ट बोर्ड) पुरेसा निधी नसल्याने हवा तसा विकास होत नसून अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. कटक मंडळाच्या कामात सुधारण्यासाठी नगरपालिका किंवा नगरपरिषद घोषित करण्यात यावी, अशी मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य शासनाचा अभिप्राय येताच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे.

राज्यात सात ठिकाणी कटक मंडळे असून त्यापैकी देवळाली कटक मंडळाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर लष्कराचे क्षेत्र असून त्यावर लष्करचा ताबा असल्याने अनेकदा गोपनीय कारभाराचा फटका नागरिकांना असून अशातच कटक मंडळांकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने हवा तसा विकास होत नाही. परिणामी स्थानिक रहिवाशांची मोठी कुचंबना होत असते. यातून मार्ग काढण्यासाठी कटक मंडळे नगरपालिका किंवा नगरपरिषदेत म्हणून घोषित करण्यासाठी विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह देवळाली कॅम्प येथील स्थानिक रहिवाशांनी खा. हेमंत गोडसे यांच्याकडे तगादा लावला होता. या अनुषंगाने खा. गोडसे यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत कटक मंडळे नगरपालिका किंवा नगरपरिषद म्हणून घोषित करण्याचे साकडे घातले असून त्याशिवाय खा.गोडसे यांनी काल दिल्लीत जावून केंद्रियमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

कटक मंडळे नगरपालिका किंवा नगरपरिषद म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्राच्या विचारधिन आहे. यासाठी केंद्राने राज्यशासनाकडे अभिप्राय मागितलेला आहे. गरज पडल्यास कटक मंडळाच्या हद्दीत असलेले लष्कराचे क्षेत्र वगळून इतर रहिवाशी झोन नगरपालिका किंवा नगरपरिषद म्हणून घोषित करण्याची आग्रही मागणी खा. गोडसे यांनी मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com