वनजमिनींंचा पट्टा ताब्यात द्या : माजी आमदार जे.पी.गावित

वनजमिनींंचा पट्टा ताब्यात द्या : माजी आमदार जे.पी.गावित

अभोणा | वार्ताहर Aabhona

शेतकर्‍यांच्या ताब्यात असलेल्या पूर्ण वनजमिनीचा forest land पट्टा मिळावा.तसेच स्वतंत्र सातबारा करून,कब्जेदार धारकांच्या नावे करावीत.असे प्रतिपादन कळवण, सुरगाण्याचे माजी आमदार जे.पी.गावित Former MLA J.P. Gavit यांनी केले.येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष्याच्या तालुका किसान सभा शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

गावित यांनी अपात्र दावेदारांचे दावे,कागदपत्रांची पूर्तता करून पात्र करावेत.दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाबाबत 28 नोव्हेंबरला होणार्‍या महापंचायतीची तयारी,मध्यवर्ती बँकेला कर्ज भरूनही कर्जदार शेतकर्‍यांना पाठविल्या जाणार्‍या नोटीसा, मतदारसंघातील विकास कामे, वाढती महागाई तसेच गरीब गरजूंसाठी घरकुल योजना,वनहक्क कायद्याच्या अंंमलबजावणीतील गोंधळ,रेशनकार्डवरील धान्याचा काळाबाजार,वृद्धापकाळ पेन्शन योजना व चणकापूर धरणाचे पाणी इतर शहरांना देण्याचा घातलेला घाट याविषयी मार्गदर्शन केले.

सावळीराम पवार,मोहन जाधव,भरत शिंदे,बाळासाहेब गांगुर्डे, निलेश महाजन, इंद्रजीत गावित यांनी मनोगत व्यक्त केले.टिनू पगार,सुभाष गांगुर्डे, सुभाष राऊत,जगन माळी,रमेश पवार,आतिष जाधव,बाळासाहेब गांगुर्डे, राजाराम पवार,प्रकाश खोडे,पाडवी दादा,तुकाराम बाबा,मोहन पवार व तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com