शिष्यवृत्ती जमा करण्याची मागणी

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची मागणी
शिष्यवृत्ती जमा करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अनुसूचित जाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवू पाहणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर व महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे ,अशी मागणी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

अनुसूचित जाती प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून केवळ रिडीमेशन प्रक्रियेत उदासीनता दाखवुन हलगर्जीपणामुळे १२ हजार ३३ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ६० कोटी ७० लाख इतकी रक्कम शासनाच्या खात्यावर पडुन असल्याची गंभीर बाब आहे.

त्यामुळे संबंधित सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांवर व महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या अध्यक्षतेखाली व राजेंद्र बागुल, सुरेश मारु, रमेश साळवे यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे , १२ हजार ३३ विद्यार्थ्यांची मंजूर शिष्यवृत्ती आॅटोरिडीमद्वारे तात्काळ थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच येत्या पाच - सहा दिवसांत संबंधितांवर फौजदारी कारवाई न केल्यास नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने आंदोलनांचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी कुसुमताई चव्हाण, अशोक शेंडगे, विकास पाथरे, मनोहर अहिरे, शिवाजी बर्डे, विजय अंभोरे, अरुण दोंदै, दिलीप अंबोरे, अनिल बहोत, संजय खैरनार, आकाश घोलप, माया काळे, वाल्मिक ढाले, प्रकाश शिंदे, केतन रेवर, अभिजित महाजन, मंच्छिद्र गायकवाड, प्रकाश खळे आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com