पंचकमार्गे सिटीलिंकचा मार्गच नाही

पंचकमार्गे सिटीलिंकचा मार्गच नाही

नाशिकरोड | Nashikroad

नाशिक महानगर परिवहन महामंडळाची बस (Nashik City link Bus) पंचक-राजराजेश्वरी-भैरवनाथनगर या मार्गे सुरु करण्याची मागणी जेलरोडच्या (Jailroad) नगरसेविका मीरा हांडगे (Meera Handge) यांनी केली आहे...

या महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्यांनी पत्र दिले आहे. त्याचा आशय असा – महामंडळाची बस जेलरोड-नाशिकरोड मार्गे सुरु करण्यात आलेली आहे.

मात्र, ही बस पूर्वीप्रमाणे म्हणजे पंचक-राजराजेश्वरी-भैरवनाथनगर या मार्गे न जाता थेट नांदूरनाक्याहून जेलरोडमार्गे नाशिकरोडकडे (Nashikroad) जाते. त्यामुळे जेलरोडच्या या भागातील नागरिकांना या बससेवेचा लाभ घेता येत नाही.

ही बस दसक बसस्थानकावर (Dasak bus stand) थांबते परंतु, या बसवर दसक बसस्थानकाचा उल्लेख केलेला नसल्यामुळे ती कोणत्या मार्गे चालली आहे, याचा बोध होत नाही. नागरिकांची याबाबत तक्रार आहे. महामंडळाने बस क्रमांक २५१ पंचक-राजेश्वरी-भैरवनाथनगर या मार्गे त्वरित सुरु करावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com