उद्योगाला चालना देण्याची मागणी

प्रहारचे तहसीलदारांना निवेदन
उद्योगाला चालना देण्याची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

युवकांना रोजगार (Employment of youth) नसल्याने त्यांचे हाल होत असून तालुक्यात नवीन उद्योगाला (New industry) चालना देऊन बेरोजगारी हटवण्याची मागणी प्रहारचे (prahar) तालुकाध्यक्ष कैलास दातीर (Taluka President Kailas Datir) यांनी तहसीलदारांना निवेदन (memorandum) देत केली आहे.

तालुक्यातील दोनही औद्योगिक वसाहतीतील (Industrial colony) अनेक उद्योग बंद असून अनेक उद्योजकांवर संकट कोसळले आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार घरी आहेत. अनेक वेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. रोजगार नसल्यामुळे तरुणांचे लग्न जमणे मुश्किल झाले आहे. कुटुंब चालणं कठीण झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी पाऊले उचलली पाहिजेत.

लवकरात लवकर यावर मार्ग न निघाल्यास नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) रास्ता रोको आंदोलन (agitation) करण्याचा इशारा निवदेनात देण्यात आला आहे. यावेळी युवा तालुकाध्यक्ष खंडेराव सांगळे, कामगार संघटना अध्यक्ष कपिल कोठुरकर, महिला तालुकाध्यक्ष रेणुका गायकर, दुर्गा मिस्तरी, शहर उपाध्यक्ष दत्ता चौधरी, दिलीप सोनवणे, नारायण गोसावी, किरण खताळे, शिरीष सोळुंके, श्रीहरी शिरसाट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com