आयुर्वेदिक-होमियोपॅथी औषधांस परवानगी द्या - महापौर

आयुर्वेदिक-होमियोपॅथी औषधांस परवानगी द्या - महापौर

नाशिक । प्रतिनिधी

करोनातून बरे होण्यासाठी होमिओपॅथी व आयुर्वेद अंतर्गत चिकीत्सा प्रणालीमध्ये कोणत्याही पॅथीचा भेदाभेद न करता निश्चितच होमिओपॅथी गोळया - औषधांचा उपयोग होऊ शकतो असे होमिओपॅथी तज्ञांचे मत आहे.

म्हणून शहरातील वाढता करोना संसर्ग व मृत्यू संख्येत होत असलेली लक्षणीय वाढ लक्षात घेता आयुष मंत्रालय द्वारा प्रमाणित आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचा वापर करोना रुग्णांसाठी करण्याकामी नाशिक महानगरपालिकेस शासन स्तरावरून मंजुरी देऊन आदेश काढावा , अशी मागणी महापौर सतिश कुलकर्णी यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महानगरपालिका व खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होण्याची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत असून रुग्णांना ऑक्सीजन बेड तसेच रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णसंख्या बघता आवश्यक व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नाही.

अशा परिस्थितीत रुग्णांना ठेवायचे कोठे व काय करावे हे महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना पडलेला मोठा प्रश्न आहे,ही वस्तुस्थिती आहे असे महापौरांनी स्पष्ट केले. आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेले होमिओपॅथी व आयुर्वेदीक या पॅथींचाही रुग्णांना करोनासारख्या आजारामध्ये औषधोपचारास मान्यता दिलेली आहे.

त्यामुळे होम क्वॉरंटाईन असणारे रुग्ण तसेच इतर नागरिक करोना बाधीत होऊ नये याकरिता होमिओपॅथीचे औषध - गोळया करोना होऊ नये यासाठी घरोघरी वितरित केल्यास रुग्णसंख्या कमी होईल.

करोना झाल्यामुळे जे रुग्ण दाखल आहेत अशा रुग्णांना अ‍ॅलोपॅथी बरोबरच होमिओपॅथीचे औषध - गोळया महानगरपालिका प्रशासनातर्फे वाटण्याकरीता महानगरपालिकेच्या आर्थिक खर्चातून देण्याबाबत परवानगी द्यावी अशा आशयाचे पत्र महापौरांंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना नुकतेच दिले आहे.

या औषधांना महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्यास नाशिक मधील रुग्ण संख्यामध्ये निश्चितच घट होण्यास मदत होईल असे तज्ञ डॉक्टरांचे मत असल्याचे महापौरांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com