वणी : आम्ही प्रशासनाला सगळी मदत करू फक्त सप्तशृंगी मंदिर सुरु करा

ग्रामस्थ, व्यापारी वर्गाची मागणी
सप्तशृंगी गड
सप्तशृंगी गड

सप्तशृंगीगड । Saptsrungigad

सप्तशृंगी गडावरील सर्व ग्रामस्थ, तसेच सप्तशृंगी नि.देवी.ट्रस्ट.कर्मचाऱ्यांनी आज सकाळी (दि.२१) पहिली पायरी येथे सर्वानुमते बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिसरातील प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित राहून सप्तशृंगी गड दर्शन सुरू व्हावा यासाठी तहसीलदार, प्रांत अधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.

साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगीगड हे लॉक डाऊन काळात बंद आहे. गडावर साधारण साडे चार हजारच्या आसपास लोकसंख्या असून या सर्वांची गडावर व्यवसाय आहे. इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मंदिर बंद असल्याने भाविक, पर्यटक येत नसल्याने येणारी अवाक बंद झाली आहे. परिणामी येथील नागरिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व व्यापारी यांनी बैठक घेत मंदिर सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यामते सप्तशृंगी गडावर जाणे- येणेसाठी एकच रस्ता असल्याने नियोजन करणे सोयीचे जाईल. तसेच सामाजिक अंतर ठेऊन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात यावे किंवा पहिली पायरी येथे आई भगवतीची प्रतिमा स्थापित करून दर्शन सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच याकामी प्रशासनाला सर्व ग्रामस्थ सहकार्य करतील व कायद्याचे उल्लंघन न करता नियमांचे पालन करू असे ग्रामस्थ ग्रामपंचायत, ट्रस्ट कर्मचारी, व्यापारी यांच्यावतीने सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com