ऑक्सिजन सिलेंडरची मागणी वाढली

ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न
ऑक्सिजन सिलेंडरची मागणी वाढली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रातील करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असुन आत्तापर्यंतच्या 18 हजार 590 रुग्णांपैकी 16 हजार 355 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आत्तापर्यत 419 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची जास्त गरज भासू लागली आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचारात व्यत्यय येऊ नये यासाठी आता जादा मागणीनुसार ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्यासाठी निविदा प्रशासनाने काढली आहे.

शहरातील करोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची आता गरज मोठ्या प्रमाणात भासु लागली असून या रुग्णांचा आकडा 500 च्यावर गेला आहे.

आत्तापर्यंत अशा रुग्णांना स्थानिक ऑक्सिजन पुरवठादाराकडुन 270 लिटर टँकमार्फत पुरवठा केला जात होता.

मात्र ऑक्सिजनची गरज वाढली असल्याने आता कमी पुरवठ्यामुळे उपचारात अडथळा निर्माण होऊ नये म्हणुन आता मोठा पुरवठादार नियुक्त करण्यासाठी प्रशासनाने यासंदर्भातील निविदा काढली आहे.

यात 6 हजार लिटर टँकमार्फत व त्यापेक्षा कमी लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन टॅक पुरविण्यासाठी आणि करोना साथ कधीपर्यत राहणार, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने पुढच्या दहावर्षासाठी ऑक्सीजन पुरवठ्याचे काम निविदेमार्फत दिले जाणार आहे.

यामुळे आता पुढच्या काळात करोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com