
नाशिक | प्रतिनिधी
एकात्मीक बाल विकास विभागाच्या अंतर्गत सुरु असलेल्या अंंगणवाड्या नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून बंद करा. अशी मागणी कामगार हितरक्षक सभेच्या बैठकीत सभानायक किरण मोहिते यांंनी केली.
नाशिक महानगर पालिकेने १९९३ पासून मनपा क्षेत्रात एकुण ४१९ अंगणवाड्या सुरू केल्या आहेत, यामध्ये एकात्मिक महिला व बाल विकास विभागानेही जवळपास २०० अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. एकाच शहरात दोन शासकिय यंत्रणा सारखाच प्रकल्प राबवित असल्यामुळे विद्यार्थी पटसंख्या मिळवण्यासाठी मनपा अंगणवाडी व आयसीडीएसच्या अंगणवाड्यामध्ये मुले पळवीण्यावरुन संघर्ष होत आहे.त्यामुळे नाशिक महानगर पालिका आयुक्तांनी आयसीडीएसच्या अंगणवाड्या महानगरपालिका क्षेत्रातून हद्दपार कराव्यात,अशी जोरदार मागणी केलीे.
अंगणवाडी मुख्यसेविका यांना १५००,अंगणवाडी सेविका १०,००० व अंगणवाडी मदतनीस ९८०० मानधन देण्याची तरतूद करावी. २०१८ साली १३६ अंगणवाड्या बंद करण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी १४ अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत, उर्वरित १२२ अंगणवाड्या ही सुरू कराव्यात. कोरोना काळात कामावर हजर होण्यास असक्षम असणाऱ्या २० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना सेवेत रूजू होण्यासाठी एक संधी द्यावी.
कोरोना काळात सक्तिने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मनपा वैद्यकिय विभागाने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या भागात सर्वेक्षण करावयास लावले, यात सर्वेक्षण करतांना सातपूर विभागातील अंगणवाडी कर्मचारी दिवंगत योगिता बोरसे व पंचवटी विभागातील दिवंगत कुंदा दळवी यांना आपला जीव गमवावा लागला आहे,या दोघींच्या कुटुंबियांना शासनाने जाहिर केलेल्या ५०,०००००/- लाख रूपयांची मदत देण्यात यावी.
अंगणवाड्यामध्ये मूलभूत सुविधा व शैक्षणिक साहित्याचा अभाव आहे, तसेच काही ठिकाणी अंगणवाडी चालविण्यासाठी जागा उपलब्ध नाही,याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांंना मनपा विभागिय अधिकारी यांनी योग्य ते सहकार्य करावे. बैठकित सचिव चैताली भालेराव, कृष्णा शिंदे, सुशिला साळवे, जतिन खतिब, सविता लोखंडे, सुनंदा धनगर, शोभा सोनार, सुनिता भोईर उपस्थीत होते.