हरणबारीतून आवर्तनाची मागणी

हरणबारीतून आवर्तनाची मागणी

नामपूर । प्रतिनिधी | Nampur

मोसम खोर्‍यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई (water scarcity) निर्माण झाली असून हरणबारी धरणातून (Haranbari Dam) पिण्याचे (drinking water) आवर्तन तात्काळ सोडण्याची (water discharge) मागणी माजी आ. दीपिका चव्हाण (former MLA Deepika Chavan) यांनी केली आहे.

मोसम नदी (mosam river) बागलाण (baglan) व मालेगाव (malegaon) तालुक्यातून वाहते. हरणबारी धरण यंदा पूर्ण भरले असून या पाण्याचा वापर पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी केला जातो. धरणात 1166 द.ल.घ.फूट पाणीसाठा होतो. त्यापैकी शेतीसाठी 750 द.ल.घ.फूट पाणी यापूर्वीच सोडण्यात आले आहे. उर्वरित पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी राखीव आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिण्यासाठी पाणी सोडले जाते. यंदा मात्र अर्धा मे उलटून सुद्धा पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी केव्हा येणार, याची आतुरता तमाम मोसम खोर्‍यातील जनतेला लागली आहे.

हरणबारीपासून मालेगावपर्यंत (malegaon) सुमारे शंभरपेक्षा जास्त गावांच्या पाणीपुरवठा योजना (water supply scheme) मोसम नदीवर (mosam river) अवलंबून आहेत. नदीकाठावरील विहिरी (well) व कुपनलिकांनी तळ गाठला असून हंडाभर पाण्यासाठी महिला-मुले वणवण फिरतांना दिसत आहेत. मोसम खोर्‍यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. नदीत पाणीच शिल्लक नसल्यामुळे मुक्या जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत.

यास्तव शासनाने तात्काळ दखल घेऊन मोसम नदीला पाणी आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी आ. दीपिका चव्हाण यांच्यासह काकडगावच्या ग्रा.पं. सदस्यां सिंधू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नामदेव सावंत, सम्राट काकडे, शशिकांत कोर, चारुदत्त खैरनार, बापू जगताप, राजेंद्र ठाकरे, रावसाहेब सावंत यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.