वीजबिल माफ करण्याची मागणी

वीजबिल माफ करण्याची मागणी

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Wani

वीजवितरणकडून ग्राहकांना देण्यात येत असलेले शेतीपंपाचे वीज बिलाचा (Agricultural pump electricity bill) बोजा दिवसेंदिवस वाढत असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला (farmers) वीजबिल (electricity bill) भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यात नवीन आलेल्या सरकारने कृषीपंपासह घरगुती वीजबिले (Household electricity bills) माफ करावे अशी मागणी होत आहे.

शेतीपंपासाठी वापरण्यात येणारा वीजपुरवठा (Power supply) व विजेचा वापर यामध्ये जमीन आसमानचा फरक असताना देखील येथे पंपाचे वीजबिल मोठ्या प्रमाणात येत आहे. वीजबिलाचा आकडा पाहून शेतकर्‍याला चक्कर येत आहे. अनेक शेतकर्‍यांची जमिन ही पडीत, कोरडवाहू असतांनाही वर्षातून अवघी चार ते पाच महिने वीजपंप वापरण्याची गरज पडते. त्यातही विजेची वाढते भारनियमन व कमी दाबाचा वीजपुरवठा (Power supply) यामुळे वीजेची मोठी बचत होत असतांनाही वीजबिलाचे आकडे मात्र वाढतच आहे.

बागायती क्षेत्रात देखील द्राक्षबागांनी (Vineyards) अनेक क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे पाण्याचा वापर मोजकाच होतो. मागील पाच ते सात वर्षाच्या शेतीपंप वीजबिलांच्या आकड्यांकडे दृष्टीक्षेप टाकला असता वीजबिलांची आकडे मोठ्या प्रमाणावर फुगलेले दिसून येत आहे. शेतीसाठी लागणारी विजेचे बिल आकारताना वीजपंप 24 तास चालेल अशा पद्धतीने बिलाची आकारणी होत असते. परंतु कमी अधिक प्रमाणात विजेचा वापर होत असल्यामुळे प्रत्येक ग्राहकाला सारख्या प्रमाणात वीजबिल आकारणी होत असते.

तसेच काही शेतकर्‍यांना कमी अधिक क्षेत्र असल्यामुळे विजेचा वापर कमी होत असून वीजबिल हे त्याच्या आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळे परिणामी वीजबिल ग्राहक भरण्यासाठी नाक-तोंड मोडतांना दिसत असतात. मध्यंतरी शेतीपंपासाठी आकारण्यात आलेले वीजबिले शेतकरी वर्गापर्यंत पोहोचत नसल्यामुळे शेतकरी (farmers) वर्गाला भरता आली नसून वीज बिलावर मोठ्या प्रमाणात रकमा करून ग्राहकांच्या हातात वीजबिल ठेवल्यानंतर ग्राहकांनी तर कपाळालाच हात लावला आहे.

परिणामी भाकरी पेक्षा भोकरेच जड झाल्याचे ग्राहकांकडून ऐकावयास मिळत आहे. सद्यस्थितीत वीजबिल आकडा मोठ्या प्रमाणावर फुगल्यामुळे शेतकरी वर्गाला ते भरणे नाकीनऊ येणार आहे. वीजपंपासाठी मीटर बसवून रिडिंग प्रमाणे बिल आकाराणे देखील गरजेचे आहे. आजपर्यंत झालेल्या वीज बिलावरची रक्कम नुकत्याच स्थापन झालेल्या नवीन सरकार पुढे आव्हान देणार्‍या ठरत असून विज मोटारपंप बिलाची थकबाकी माफ करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com