विद्यार्थ्यांचे लसीकरण करा; मगच शाळा, महाविद्यालये उघडा

विद्यार्थ्यांचे लसीकरण करा; मगच शाळा, महाविद्यालये उघडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विद्यार्थ्यांना प्रथम लस (Corona Vaccine) द्या, मगच शाळा व महाविद्यालये उघडण्याचा विचार करा, अशा मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर (Dr. Vasant Thakur) यांनी मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) केली आहे...

गेल्या दीड-दोन वर्षापासून करोना (Corona) महामारीने संपूर्ण जगाचे व देशाचे कार्य पद्धती बदलून गेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा (Online Education) पर्याय शासनातर्फे सुरू आहे.

ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी व कमतरता ही विद्यार्थ्यांना सतत जाणवत असतात. महाराष्ट्र राज्याने नुकताच ४ ऑक्टोंबरपासून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे.

परंतु, सर्व प्रथम विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन प्रथमतः विद्यार्थ्यांना लस द्या व नंतर शाळा व महाविद्यालये उघडावी,असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये दिवसाला ८ ते १० लाख लोकांचे प्रतिदिन लसीकरणाचे (Vaccination) विक्रम करीत आहे. दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काही लाखांमध्ये विद्यार्थी असून राज्य सरकारने (Maharashtra Government) जर ठरविले तर महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करू शकतील.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील अनेक लहान मुले मोठ्या संख्येने करोनाग्रस्त आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत शाळा व महाविद्यालये सुरू झाले तर संख्या वाढून मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये याचे लक्षण पसरणार नाही का? असेदेखील पत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे सर्व शिक्षकांना लसीकरण सक्तीचे असतांना मग विद्यार्थ्यांना लसीकरण का नको? म्हणून महाराष्ट्र शासनाने ४ ऑक्टोंबरपासून ८ वी ते १२ वी शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचा फेर विचार करण्यात यावा, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्यावतीने शहराध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com