लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाची मागणी

30 हजार लोकसंख्येला फक्त 100 डोस
लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाची मागणी

दिंडोरी । नितीन गांगुर्डे

दिंडोरी शहरात 30 हजार लोकसंख्या असतानाही केवळ 100 लसीकरणाचे डोस मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरण डोस संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दिंडोरी शहरात आज मितीस 30 हजाराच्या पुढे नागरिक राहतात. दिंडोरीची लोकसंख्या कागदोपत्री 17 हजार असले तरी ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार आहे. आता दहा वर्षात दिंडोरी शहरात अनेक नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहे. त्यामुळे ही लोकसंख्या आता 30 हजाराच्या पुढे गेली आहे.

आजूबाजूच्या परिसरातही नागरिक राहतात. मळ्यात, वस्तीवर अनेक घरे वाढली आहे. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात लोकही येत जात असतात. या पार्श्वभूमीवर सध्या करोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. परंतू दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात फक्त 100 डोस आजपासून येण्यास सुरु झाले आहे.

जर यापैकी 50 डोसची ऑनलाईन नोंदणी होते तर उरलेले 50 डोस कुंपन पध्दतीने दिले जातात. परंतू हे डोस फार लवकर संपुन जातात. 30 च्या पुढे लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. 30 हजार लोकसंख्येला 50 डोस देणे म्हणजे एक प्रकारे दिंडोरी शहरावर आरोग्य विभागाने केलेला अन्यायच आहे. मागील काळात दिंडोरी शहरातील गर्दी पाहता तळेगाव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ. भारती चव्हाण यांनी दिंडोरीत लसीकरण केंद्राव्दारे मोहीम राबवली होती. त्याचा फायदा दिंडोरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना झाला होता. सद्यस्थितीत दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात गर्दी होते.

डोस सख्या कमी असल्याने ग्रामीण रुग्णालयात तीन ते चार वेळेस गदारोळही झाला होता. एका वेळेस पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यात कर्मचार्‍यांच्या ओळखीचे लोक मध्येच येतात. दिंडोरीत आरोग्य यंत्रणेला गर्दीला आवर घालता येणे अवघड होणार आहे. आता युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने दिंडोरी शहरात आरोग्य विभागाने डोस संख्या वाढवून देणे गरजेचे आहे.

मागील काळात 45 वर्षाच्यां पुढील नागरिकांसाठी दिंडोरी शहरातील गांधीनगर उपकेंद्रात लसीकरण ठेवण्यात आले होते. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. कोशिरे, डॉ. भारती चव्हाण यांनी योग्य नियोजन केल्याने लसीकरणाचा फायदा झोपडपट्टी भागातील रहिवाश्यांना झाला होता. आता पुन्हा शासनाने 18 वर्षाच्या पुढील युवकांना गांधीनगर येथे लसीकरण उपलब्ध करुन द्यावे.

हरीभाऊ चारोस्कर, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी

दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत 45 वर्षापुढील 7 हजार 140 लाभार्थ्यांना करोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. शासनाच्या नियमानुसार ऑनलाईन नोंदणी व प्रत्यक्ष नोंदणी यातून नागरिकांना उपलब्ध लसी देण्यात आल्या. सध्या मागणी जास्त व लस कमी असल्याने शासकीय नियमानुसार क्रमवारीने लस दिले जातात.

डॉ. विलास पाटील, वैद्यकिय अधिक्षक, दिंडोरी ग्रामीण रुग्णालय

दडोरी तालुक्याच्या ग्रामीण भागात लाभार्थी संख्या कमी असतानाही डोस संख्या जास्त आहे. अनेक केंद्रावर लस शिल्लक राहतात. आताच्या परिस्थितीनुसार दिंडोरीत युवकांची संख्या जास्त असल्याने लस उपलब्ध करुन द्याव्यात.

पोपट चौघुले, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com