शाळास्तरावर लसीकरणाची मागणी

शाळास्तरावर लसीकरणाची मागणी

जानोरी । वार्ताहर Janori

सध्या शासनस्तरावरुन 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण (vaccination) करण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे.

सध्या ओमायक्रॉनचा (omicron) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने (Department of Health) शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात न आणता व 100 टक्के लसीकरण होण्यासाठी शाळास्तरावरच लसीची उपलब्धता करुन देवून लसीकरण करुन घ्यावे, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

शासन निर्णयानुसार दि. 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण (Vaccination of children) सुविधा उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचबरोबर 10 जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचार्‍यांना व इच्छुक 60 वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात असले तरी 15 ते 18 वयोगटातील मुलांची संख्या जास्त असल्याने जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) एकत्र गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. सध्या ओमायक्रॉनच्या (omicron) दहशतीखाली सर्व सामान्य नागरिक आलेला असताना स्वत: च्या पाल्याला या गर्दीत लसीकरणाला पाठवण्यासाठी पालकांमध्ये व्दिधा मनस्थिती तयार झाली आहे.

शाळा (shcool) किंवा महाविद्यालय (college) स्तरावर विद्यार्थ्यांच्या (students) संख्येनुसार लस उपलब्ध करुन शाळा स्तरावरच हजेरी पत्रकानुसार विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination of students) करुन घेतले तर नक्कीच त्याचा लसीकरण संख्येवर परिणाम होवून 100 टक्के लसीकरण होईल, यात शंका नाही.

त्याचबरोबर पालकही विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी पाठवण्याऐवजी शाळास्तरावर पाठवण्यासाठी पालक अनुकुलता दर्शवतील. तालुका वैद्यकीय अधिकारी व गटशिक्षणधिकारी यांच्या समन्वय व मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer),

केंद्रप्रमुख तसेच स्थानिक आरोग्य कर्मचारी (Local health workers) व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळा स्तरावर लस उपलब्ध करुन देवून लसीकरणाची व्यवस्था केली तर ती अधिक प्रभावीपणे राबविली जावू शकते. त्यामुळे संबंधित विभागाने याची दखल घेऊन 15 ते 18 वयोगटातील मुलांना शाळास्तरावरच लस उपलब्ध करुन देण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com