मामको निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी

मामको निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अनेक बँका (banks) डबघाईस आल्या आहेत. मात्र राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक पध्दतीने कारभार सुरू असल्याने मामको बँक (MAMCO BANK) आजही नफ्यात आहे.

एकमताने होत असलेला बँकेचा कारभार योग्य संचालक मंडळाच्या हाती असल्याने निवडणुकीवर (election) होणारा खर्च टाळून बँक अधिक प्रगतीपथावर कुठलेही राजकारण (politics) न करता मामकोची निवडणूक (election) बिनविरोध (Unopposed) व्हावी, अशी अपेक्षा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसह व्यापारी-उद्योजकांतर्फे येथे व्यक्त केली गेली. मामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 5 नोव्हेंबररोजी मतदान (voting) घेतले जाणार आहे.

27 ऑक्टोंबरपर्यंत नामांकन माघारीची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येथील आयएमए सभागृहात मामको संचालकांसह शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते-पदाधिकारी, मामको सभासद यांची बैठक चेअरमन राजेंद्र भोसले (Chairman Rajendra Bhosale) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी व व्यापारी, सभासदांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा मनोदय व्यक्त केला.

या बैठकीत बँकेच्या आर्थिक उत्कर्षासह संचालक मंडळातर्फे राजकारण (politics) विरहित एकमताने सुरू असलेल्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. 30 वर्षापासून बँकेची घोडदौड राजेंद्र भोसले यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सुरू आहे. यामुळे बँक नफ्यात राहण्याबरोबर ठेवीदारांचे पैसे देखील सुरक्षित आहे. तालुक्याची अर्थवाहिनी ठरलेल्या मामकोस आर्थिकदृष्ट्या पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुकीवर (election) होणारा मोठा खर्च वाचविणे गरजेचे आहे.

या दृष्टीकोनातून ही निवडणूक बिनविरोध (Election unopposed) व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे माजी उपमहापौर नीलेश आहेर, घोडके, माजी स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्रीरामा मिस्तरी, माजी जि.प. सदस्य सुरेश त्र्यंबक पवार, भाजप नेते हरिप्रसाद गुप्ता, अशोक सोनगिरे, पिंटू कर्नावट, मंगेश जाधव, गौतम शाह, केवळ हिरे, सोमनाथ वडगे, प्रभाकर वारूळे, संजय जोशी, संजय पहाडे आदींनी यावेळी बोलतांना दिली.

यावेळी मार्गदर्शन करतांना चेअरमन राजेंद्र भोसले संचालक मंडळ बँकेचा कारभार बघतांना सर्वांना विश्वासात घेवून एकमताने करत असल्याने मामको बँक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. संचालक होण्याची अनेक उमेदवारांना इच्छा आहे. हे या बँकेचे वैभव म्हटले पाहिजे. बँकेची वाटचाल बघूनच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी-पदाधिकार्‍यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीकोनातून कुठलेही नवीन पॅनल तयार केले नाही. हा निर्णय होत असलेल्या चांगल्या कारभाराची पावती म्हटली पाहिजे.

गेल्या 60 वर्षात प्रथमच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संचालक होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र जागा मर्यादित असल्यामुळे सर्वांना सामावून घेता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत भोसले पुढे म्हणाले, बँकेच्या प्रगतीसाठी निवडणुकीच्या रिंगणात न उतरता एक वेगळा पायंडा आपल्याला आला तर तो दिला पाहिजे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेला माघारीच्या दिवशी पॅनलची घोषणा केली जाणार आहे. ज्या इच्छुकाची नावे पॅनलमध्ये नसतील त्यांनी माघार घ्यावी, असे आवाहन भोसले यांनी शेवटी बोलतांना केले.

या सहविचार सभेस मनोहर बच्छाव, अजय शाह, धर्मा भामरे, अजयमामा मंडावेवाला, सुराणा, बंडू माहेश्वरी, नंदू सावंत, सुनिल देवरे, मुकूंद दिक्षीत, मधुकर देवरे, बबलू पाटील, रवी पगार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचालन सतिष कलंत्री यांनी तर आभार अ‍ॅड. संजय दुसाने यांनी मानले.

सभा यशस्वीतेसाठी दिनेश ठाकरे, नीलेश पाटील, मुकेश शर्मा, राजू जोशी, अशोक चित्ता, किशोर इंगळे, मनीष चिंतामण पगारे, शितल शाह, प्रदीप खैरनार, अशोक चौधरी, अतुल शाह, नारायण पगार, राजेंद्र पवार, महेश शेरेकर, अनिल पाटील, सुहास भावसार आदींनी परिश्रम घेतले. सभेस मोठ्या संख्येने सभासद, ठेवीदार, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com