वीज पुरवठा अखंडीत ठेवण्याची मागणी

भाजपचे महावितरणला निवेदन
वीज पुरवठा अखंडीत ठेवण्याची मागणी

नाशिकरोड । प्रतिनिधी

करोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी वीज पुरवठा अखंडीत सुरु ठेवावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता दिपक कुमठेकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनांत म्हटले की करोनाची दुसरी लाट ही अत्यंत जीवघेणी सिध्द होत आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या कमी पडू लागलेली आहे. रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारासोबत ऑक्सिजन पुरवठासुध्दा तितकाच महत्वाचा आहे. आपापल्या घरात उपाचार घेणार्‍या करोणा रुग्णांसाठी अ‍ॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे संजीवनी ठरत आहे.

परंतु त्यासाठी अखंड वीज पुरवठा अत्यावश्यक असुन काही मिनिटांसाठी वीज पुरवठा खंडीत झाला तरी प्राणवायू अभावी रुग्णांचे मृत्यृ होवू शकतो. तरी संभाव्य दुर्घटना टाळण्यालाठी नाशिक विभागात अखंडीत वीज पुरवठा सुरु ठेवावा.

योग्य नियोजन करुन प्राणवायुवर असलेला रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड, राजेश आढाव, विनोद खरोटे, किरण पगारे, अशोक गवळी, संदीप शिरोळे, गौरव विसपुते, भूषण शहाणे, ओमकार लबडे, संदीप कारवाल, करण गायकवाड, प्रीतम संगवी आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com