आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहाची मागणी

आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहाची मागणी

अंबासन । वार्ताहर | Ambasan

नामपूर (nampur), ता. बागलाण (baglan) येथे आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय वस्तीगृह (Government dormitory) मंजूर करावे, अशी मागणी भाजप (BJP) आदिवासी आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आकाश साळुंके (Aakash Salunke) यांनी कळवण (kalwan) प्रकल्प अधिकार्‍यांच्याकडे केली आहे.

नामपूर येथे आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची (Tribal students) मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना (students) शाळा (school), महाविद्यालयात (college) ये-जा करण्यासाठी वेळेवर बस मिळत नाही. तसेच घरची परिस्थिती गरीबीची असल्यामुळे विद्यार्थी देखील मोलमजूरी करतात. त्यामुळे इतर खाजगी वाहतूक (Private transport) खर्च परवडत नाही. नामपूर हे पंचक्रोशीतील 42 खेडयांच्या बाजारपेठचे शहर म्हणून ओळखले जाते.

हे शहर केंद्रस्थानी असल्यामुळे दूरच्या वस्तीगृहांचा विद्यार्थ्यांना (students) उपयोग होत नाही. परिणामी, बहुतेक विद्यार्थी विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहतात. पुढील शिक्षण (education) न मिळाल्याने त्यांना शेवटी मजुरीकडेच वळावे लागते. सदर परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास (Educational development) व्हावा यासाठी येथे मुलांचे व मुलींचे शासकीय वस्तीगृह होणे आवश्यक आहे.

नामपूर शहरात 2 माध्यमिक विद्यालये, 2 कनिष्ठ महाविद्यालये व 1 वरिष्ठ महाविद्यालय असून इयत्ता 8 वी ते वरिष्ठ महाविद्यालयातील आदिवासी मुलांची 350 तर मुलींची 300 एवढी पटसंख्या आहे. आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पटसंख्येला अनुसरुन नामपूर येथे आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वस्तीगृह सुरु करण्यात यावे,

असे निवेदन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्‍यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण पाटील व वस्तीगृहप्रमुख बुरकुले यांना आकाश साळुंके, कासुबाई दावल ठोके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय ठोके, यश कंकरेज, जितेंद्र अहिरे यानी सादर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com