स्थानिक वाहनांना टोलमाफ करा

स्थानिक वाहनांना टोलमाफ करा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सिन्नर-नाशिक रोडवरील (Sinnar-Nashik Road) शिंदे येथील टोल नाक्यावर (Toll Naka) स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती मिळावी अशी मागणी घेऊन सिन्नर तालुका (Sinnar Taluka) राष्ट्रवादी काँग्रेस नजीकच्या काळात आक्रमक भूमिका घेणार आहे, असा निर्धार आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

शिंदे येथील टोल नाक्याच्या कारभाराबद्दल बैठकीत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. घोटी व संगमनेर (Sangamner) येथील या धर्तीवर स्थानिकांना टोल मोफत असावा अशी मागणी करण्यात आली.

शनिवारी (ता.) याबाबत संबंधित विभागांना निवेदन देण्यात येणार आहे. तथापि स्थानिकांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पंधरा दिवसानंतर टोल नाक्यावर हजारो नागरिकांना घेऊन आंदोलन करणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व आमदार माणिकराव कोकाटे करतील.

बैठकीस तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, कोंडाजीमामा आव्हाड, विठ्ठल उगले, सुदाम बोडके, किरण मुत्रक, अनिल वराडे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com