किसान रेल, मालगाडी सुरू करण्याची मागणी

किसान रेल, मालगाडी सुरू करण्याची मागणी

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

उष्णतेची लाट (Heat wave) आल्याने वीज टंचाई (Power shortage) निर्माण होऊ नये यासाठी प्रचंड प्रमाणात कोळसा वाहतूक (Coal transportation) सुरू झाली आहे.

या कोळसा वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी किसान रेल (Kisan Rail) आणि मालगाड्या 13 एप्रिल पासून काही कालावधीसाठी अचानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतल्याने शेतकर्‍यांसह (farmers) व्यापार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. किसान रेल आणि मालगाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी रेल्वे विभाग (Railway Department) आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांच्याकडे प्रवाशांनी केली आहे.

राज्यासह देशांतर्गत उष्णतेची लाट आल्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. औष्णिक केंद्रांवर (Thermal centers) कोळशाचा तुटवडा (Shortage of coal) निर्माण होऊन वीजेचे संकट येऊ नये यासाठी रेल्वेने प्रचंड प्रमाणात कोळसा वाहतूक केली जात असल्याने या वाहतुकीवर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी 20 जानेवारी 2021 पासून परराज्यात शेतमाल विक्री (Sale of farm produce) करता यावे तसेच या शेतीमालाचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळावा यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने 45 टक्के अनुदानित तत्त्वावर मोठ्या थाटात नाशिकरोड रेल्वे स्थानकातून (Nashik Road Railway Station) दानापुर पर्यंत आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या चार दिवशी सुरू केलेली किसान रेल (Kisan Rail) अचानक 13 एप्रिल पासून सात दिवसांच्या कालावधीसाठी बंद करण्यात आली होती.

यात मुदतवाढ देत 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे विभागाकडून (Railway Department) घेतल्याने इंधनाच्या दरात दररोज वाढ होत असल्याने मालट्रकच्या भाड्यात देखील वाढ झाल्याने शेतकर्‍यांना आपला शेतमाल परराज्यात पाठवण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करण्याची वेळी आली आहे. तसेच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने किसान रेल तत्काळ सुरू करावी अशी मागणी बाळासाहेब सोनवणे, सतीष सोळ्शे, राम सोळ्शे, सागर शिरसाठ, कुणाल केदारे, वैभव शिरसाठ, रोहित खैरनार, अभिजित इंलाजे, सत्यजित दाभाडे, विशाल केदारे, मधूकर निकम, गौरव बैरागी, निखील मोरे, ओमकार सोळशे, विकी केदारे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.

शेतीमालातून मिळणार्‍या उत्पन्नावर पाणी

नासिक रोड ते दानापुर पर्यंत आठवड्यातून चार दिवस किसान रेलच्या माध्यमातून रेल्वे विभागाला 40 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या पंधरा दिवसांपासून किसान रेल्वे बंद असल्याने आठ किसान रेल न गेल्यामुळे 80 लाख रुपयांच्या उत्पन्नावर रेल्वेला पाणी सोडावे लागले आहे. तसेच मालगाडीच्या माध्यमातून परराज्यात कांदा पाठवला जातो. मालगाडी बंद असल्याने व्यापार्‍यांना परराज्यात कांदा पाठवणे जिकरीचे झाले आहे.

वाढलेल्या इंधनाच्या दरामुळे मालट्रकच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. परराज्यात कांदा कसा पाठवावा असा प्रश्न व्यापार्‍यांसमोर उभा राहिला आहे. दररोज एक मालगाडीतून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातून कांदा परराज्यात पाठवला जातो. यातून रेल्वेला 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. गेल्या पंधरा दिवसांपासून पंधरा मालगाडीतून कांदा न पाठवल्या गेल्यामुळे दीड कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com