कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

राज्यातील कांदा उत्पादन शेतकर्‍यांना ( Onion Growers Farmers ) अनुदान मिळण्याची मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde ) यांना निवेदन पाठवत केली आहे.

गेल्या सात महिन्यांपासून शेतकर्‍यांच्या कांद्याला कमीत सरासरी 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. दिवसेंदिवस पिकासाठी लागणारे खते, औषधे, बियाणांच्या किंमतीत व मजुरीतही भरमसाठ वाढ झाल्याने कांदा लागवड करणे महागात पडत आहे.

कांद्याचा उत्पादन खर्च हा सरासरी 22 ते 25 रुपये प्रति किलो इतका आहे. 5 ते 10 रुपये प्रति किलोच्या भावात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरुन निघत नसल्याने शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान भरुन निघण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ कांद्याला प्रती क्विंटल 800 रुपये अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा निर्यात करावा. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार, संपर्क प्रमुख कुबेर जाधव, प्रवक्ते शैलेंद्र पाटील, ओंकार पाटील, हेमंत बिरारी, सुभाष शिंदे यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com