सिन्नर ते चांदवड बससेवेची मागणी

सिन्नर ते चांदवड बससेवेची मागणी

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

कोवीड (corona) काळापासून बंद असलेली सिन्नर ते चांदवड (Sinnar to Chandwad) बससेवा (bus service) सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी सिन्नर आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांंना निवेदन (memorandum) देत केली आहे.

ही बससेवा (bus service) बंद असल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसाय होत आहे. ही बस बारागाव पिंप्री, म्हाळसाकोरे, मांजरगाव, सायखेडा, चांदोरी, रानवड कारखाना, सुकेणे व निफाड मार्गे चांदवड येथे जात होती व पुन्हा याच मार्गाने परत सिन्नर येथे येत असे. निफाड (niphad), चांदवड (chandwad) तालुक्यात सिन्नर (sinnar) तालुक्यातील रहिवाशांचे नातेसंबंध असल्याने तिकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्याही अधिक होती.

मात्र, काही दिवसांपासून आगाराने कुठलीही पूर्वसूचना न देता ही बससेवा बंद केल्याने या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यांना नाशिक मार्गे फिरुन चांदवड गाठावे लागत असून त्यात वेळ व पैशाचाही अपव्यय होत आहे. निफाडला जाण्यासाठीही सकाळी ही बस असल्याने चांगलीच उपयोगी पडत होती. प्रवाशांची वाढती गैरसोय पाहता पुन्हा ही बससेवा सुरु करुन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी गोसावी यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com