शिरवाडे - धुळे रस्ता सहापदरीकरणाची मागणी

शिरवाडे - धुळे रस्ता सहापदरीकरणाची मागणी

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Vani

मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Agra National Highway) क्रं. तीन वर शिरवाडे फाटा ते धुळे (dhule) दरम्यान 118 किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरण करावे अशी मागणी प्रवाशी व वाहन चालकांनी केली आहे.

शिरवाडे (Shirvade) ते धुळे (dhule) हा रस्ता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग (Road Mumbai-Agra National Highway) क्रमांक तीन वर जरी येत असला तरी हा रस्ता नाशिक जिल्ह्यातून (nashik district) विविध प्रकारच्या राज्यांमधून जात असून दळण-वळणाच्या तसेच व्यापार व उद्योगधंदे यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यातच जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा (onion), द्राक्षे (Grapes), मका (Maize), सोयाबीन (Soybean), भाजीपाला (Vegetables) आदी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होऊन हा सर्व शेतमाल निर्यात (Export of farm goods) होत असल्याने येथे व्यापार्‍यांची संख्या मोठी आहे.

साहजिकच दळण-वळण व उद्योगधंद्यांचा विचार करता या रस्त्याचे रुंदीकरण (Road widening) होणे गरजेचे आहे. मागील सात वर्षांपूर्वी दोन पदरी असलेला हा रस्ता रहदारीच्या अनुषंगाने सुरवातीच्या कालावधीत धुळे ते शिरवाडे वणी पर्यंत सोमा या टोल वे कंपनीने रस्त्याचे विस्तारीकरण करून त्याचे चार पदरी रुंदीकरण केले होते. बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या योजनेमुळे या रस्त्यावर टोलनाका (toll naka) बसविण्यात आला होता. तर पिंपळगाव (pimpalgaon), लासलगाव (laslgaon) बाजारपेठेतून परराज्यात शेतमाल पाठवतांना 10 टनापासून 30 टनांपर्यंत वाहतूक करणार्‍या वाहनांचा वापर केला जातो.

त्यातच या रस्त्यावर दिवसागणिक रहदारीत वाढ होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहनांचा ताशी वेग 100 ते 120 गतीने असतो. त्यामुळे रहदारीच्या विळख्यात वाहने नियंत्रणात न आल्यास त्याचा परिणाम अपघातात होत असतो. त्यामुळे शिरवाडे ते धुळे या 118 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरणातून सहापदरीकरण रस्त्यामध्ये रूपांतर करण्यात यावे ही काळाची गरज निर्माण झाली असून तशी मागणी जिल्ह्यातील व्यावसायिक, व्यापारी वर्ग, प्रवाशी, वाहनचालक यांचेकडून होत असल्याने प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com