आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी

आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी

सायखेडा । प्रतिनिधी saykheda

गोदावरी नदीच्या खोर्‍यात जवळपास पंचेचाळीस गावांचा गोदाकाठ भाग असून या ठिकाणी जवळपास 40 किलोमीटरच्या अंतरावर केवळ चांदोरी ( Chandori ) आणि म्हाळसाकोरे( Mhalsakore ) हे दोनच आरोग्य केंद्रे ( Health Centers )असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठी धावपळ करावी लागते.

शिवाय या ठिकाणी सगळ्याच सुविधा नसल्याने रुग्णांना उपचारादरम्यान अडचणी येतात. रुग्णांची परवड थांबावी यासाठी गोदाकाठ भागात सुसज्ज रुग्णालय उभारावे, अशी मागणी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका डेर्ले ( BJP district vice president Dr. Sarika Derley ) यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar ) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंत्री डॉ. भारती पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. सारिका डेर्ले यांनी त्यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गोदाकाठ हा शेतीसाठी समृद्ध भाग आहे. या ठिकाणी सर्व शेतकरी, शेतमजूर राहतात. आर्थिकदृष्ट्या मजबूत नसलेल्या वर्गाला खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही.

सरकारी रुग्णालय हे खूप अंतरावर असून त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांना निफाड किंवा पिंपळगाव बसवंत येथे उपचारासाठी जावे लागते. तसेच यात खूप वेळ जातो. सर्पदंश किंवा अपघात, रेबीज, विषबाधा यांसारखे रुग्ण असल्यास उशिरा उपचार मिळाले तर जीविताला धोका निर्माण होण्याची भीती असते. असे अनेक रुग्ण दगावले आहेत. यासाठी गोदाकाठ भागात सुसज्ज रुग्णालय उभारावे. शेतकरी, मजूर यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी डेर्ले यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com