ब्रह्मगिरीवर रोप वे करा; मंत्री गडकरींना साकडे

ब्रह्मगिरीवर रोप वे करा; मंत्री गडकरींना साकडे

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वरला दर्शनाला येणार्‍या भाविक ब्रह्मगिरीवर (Brahmagiri) जावून गोदावरी उगमस्थान, गंगाद्वार दर्शन करतात. या भाविकांना पायर्‍यांशिवाय वर जाण्यास पर्याय नसल्याने दमछाक होते...

त्यामुळे ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी रोप वे उभारावा, यासाठी प्रसाद योजनेतून निधी द्यावा, असे साकडे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घालण्यात आले. त्यामुळे ब्रह्मगिरीवर रोप वे उभारणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

केंद्रिय मंत्री असलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्र्यंबकेश्वरला खासगी दौरा करून पुजाविधी केली. त्यांनी कोणत्याही भाजप पदाधिकार्‍यांना भेटण्याचे टाळले होते.

मात्र, त्र्यंबकेश्वरचे काही भाजप पदाधिकारी आणि शासकीय अधिकार्‍यांनी भेट घेत आपले मुद्दे असलेले निवेदने सादर केले. यावेळी हर्षल भालेराव, सुयोग वाडेकर, कमलेश जोशी आदी उपस्थित होते.

डगकरी यांनी येथे पूजाविधी केला. पूजेच्या निमित्ताने सुमारे सहा तास गडकरी यांनी येथे वेळ दिला. येथील वामन गायधनी यांंच्याकडे त्यांनी पूजन केले. सकाळी 8 पासून ते दुपारी 4 पर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

यावेळी गडकरी भाजपच्या पदाधिकार्‍यांंना भेटले. श्रीकांत गायधनी उपस्थित होते. प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे यांनीही शासकीय प्रोटोकॉल पाळत गडकरी यांची भेट घेतली.

Related Stories

No stories found.