तलाठी कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी

तलाठी कार्यालय पूर्ववत सुरू करण्याची मागणी

मटाने | प्रतिनिधी Matane

मटाने Matane येथे पूर्वी सुरू असलेले तलाठी कार्यालय Talathi Office पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन बंद असलेले कार्यालय सुरू करण्यात यावे यासाठी निवेदन दिले आहे.

मटाने येथे शासनाने लाखो रुपये खर्च करून नूतन तलाठी कार्यालय बांधले आहे. यात कार्यालयातून मटाणे वरवंडी वाजगाव या तीन गावांचे कान कामकाज पाहिले जात होते. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून हे कार्यालय बंद आहे. सदरचे कामकाज रामेश्वर येथे केले जात आहे. शेतकरी, विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होते. सदरचे कार्यालय ठाणे येथे सुरू करून नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वरवंडी येथून रामेश्वर जाण्यासाठी १५ कि.मी. चे अंतर पार करावी लागते, मटाने येथून ४/५ की.मी. अंतर होते मात्र नदीला पाणी चालू असल्यामुळे आता ८/९ किमी अंतर जावे लागते आणि रामेश्वर जाण्यासाठी कोणत्याही वाहनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे हे कार्यालय मटाने येथे पुन्हा सुरू करावे म्हणून मागणी होत आहे. मागच्या वर्षी शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून नूतन कार्यलयाचे बांधकाम केले.

Related Stories

No stories found.