गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत करा

गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत करा

लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan

गोदावरी एक्स्प्रेस (Godavari Express) पूर्ववत मनमाड येथून लवकर सुरू करावी, अशी मागणी येथील युवकांनी केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून गोदावरी एक्स्प्रेस बंद असल्याने येथून अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहे…

मनमाड (Manmad), लासलगाव (Lasalgoan), निफाडहून (Niphad) अप-डाऊन करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गोदावरी एक्स्प्रेस बंद झाल्याने मोठे हाल होत आहे.

केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार (Dr.bharti Pawar) यांच्या मतदार संघातून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. मागील 30 वर्षांपासून सुरू असलेली गाडी मनमाडऐवजी इतरत्र हलवण्याची योजना चालू आहे.

याबाबत मंत्री महोदयांनी विरोध करून गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत मनमाड येथून लवकरात लवकर सुरू करावी. सदर गाडी ही लासलगावसाठी जीवनवाहिनी आहे. आधीच करोना काळात (Corona) चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

त्यात गोदावरी एक्स्प्रेस बंद झाल्यास नाशिक व इतरत्र मजुरीसाठी जाणार्‍या लोकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तरी याबाबत पुढाकार घेऊन गोदावरी एक्स्प्रेस लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी लासलगाव येथील नागरिकांनी फलकाद्वारे केली आहे.

याप्रसंगी संदीप उगले (Rajendra Ugale), राजेंद्र कराड (Rajendra Karad), मयूर झांबरे (Mayur Zambre), बापू कुशारे, भगवान बोराडे, चंद्रकांत नेटारे, नंदू फसाले, अक्षय जगताप, हमीद शेख, पीयूष बकरे, मंगेश रोटे, दत्ता जगताप, हमीद शेख, भरत गिते आदींसह परिसरातील प्रवासी नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com