शिरवाडे वणी-रानवड रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

पंधरा वर्षात रस्त्याची दुरुस्तीच झाली नसल्याची नागरिकांची तक्रार
शिरवाडे वणी-रानवड रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

शिरवाडे वणी। वार्ताहर Shirvade Vani

शिरवाडे (Shirvade) ते रानवड (Ranvad) या 9 किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे (Potholes) पडले असून परिसरातील शेतकरी (Farmers), नोकरदार, वाहनचालक (Driver), शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी (School and college students) यांचा प्रवास खडतर बनला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती (Road repairs) करावी अशी मागणी होत आहे.

शिरवाडे वणी हे गाव निफाड तालुक्याच्या (Niphad Taluka) उत्तरेला शेवटच्या टोकाला राष्ट्रीय महामार्ग क्रं.3 (National Highway No.3) ला जोडून येते. साहजिकच शिरवाडे ते रानवड या 9 कि.मी. रस्त्याचे उत्तरेकडील टोक राष्ट्रीय महामार्गाला (National Highways) तर पुर्वेकडील टोक लासलगाव बाजार समितीला (Lasalgaon Market Committee) जोडले आहे. या रस्त्यावर शिरवाडे, गोरठाण, सावरगाव, वावी, रानवड परिसरातील शेतकरी, शेतमजूर ये-जा करीत असतात. शेतीमालाची वाहतूक (Transportation of agricultural commodities) याच रस्त्याने होते.

पिंपळगाव (Pimpalgaon) व लासलगाव या दोन बाजारपेठांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. परंतु सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता पार गेलेल्या पाईपलाईनमुळे या रस्त्याला नाल्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील वाढते खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतमालाची अनेक वाहने नादुरुस्त रस्त्यामुळे मध्येच बंद पडत असून खराब रस्त्यामुळे शेतमाल कधीही वेळेवर बाजारपेठेत पोहचत नाही.

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकर्‍यांना आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. शेतमाल वाहतूक करणारी भाडोत्री वाहने या रस्त्याकडे चुकूनही फिरकत नाही. निवडणुका आल्या की या परिसरातील नेत्यांना रस्त्याची आठवण होते. निवडणुका संपताच सगळे विसरून जातात. त्यामुळे आता या रस्त्याचा प्रश्न केव्हा मार्गी लागेल ही समस्या शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याची वेळीच दखल घेत नव्याने दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे युवा सेना उपतालुका प्रमुख सुभाष निफाडे, प्रितेश निफाडे, सुनील निफाडे, नवनाथ निफाडे, नाजिम शेख, अशोक ढोमसे, संजय ढोमसे, गोटीराम ढोमसे, भाऊसाहेब ढोमसे, भाऊलाल हांडे, जितेंद्र निफाडे, अमोल निफाडे, सचिन निफाडे आदींसह शिरवाडे वणी, गोरठाण, वावी, नांदूरखुर्द, रानवड, काकासाहेबनगर परिसरातील शेतकरी, वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.

रस्त्याअभावी प्रवाशी वाहनांची वाणवा शिरवाडे ते वावी, रेडगाव हा रस्ता शेतमाल वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाचा असून या रस्त्यावर नित्याची वर्दळ असते. मात्र अनेक ठिकाणी हा रस्ता अरूंद झाला असून परिसरातील गोरठाण, वावी, नांदूरखुर्द येथे जाण्यासाठी या मार्गावर परिवहन महामंडळाची बससेवा नाही. तसेच खासगी प्रवाशी वाहतूक देखील नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, चाकरमाणी, शेतमजूर यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतमाल वाहतूकीला अडचणी येतात. गेल्या दहा ते पंधरा वर्षात या रस्त्याची दुरुस्तीच झाली नाही. त्यामुळे आता या रस्त्याचे नव्याने रूंदीकरण करून डांबरीकरण करावे. तसेच रस्त्याच्या कडेच्या साईडपट्टया भरण्यात येवून हा रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत करावा.

- सुभाष निफाडे, शेतकरी (शिरवाडे वणी)

Related Stories

No stories found.