धोकादायक विद्युत खांब व तारा दुरुस्तीची मागणी

धोकादायक विद्युत खांब व तारा दुरुस्तीची मागणी

पुनदखोरे । वार्ताहर

कळवण शहरासह तालुक्यात पावसाळा हा हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहे. विज महावितरणकडून तालुक्यातील धोकादायक विद्युत कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी केली जातात. पंरतू अद्यापही धोकादायक कामे होत नसल्याने कामांबाबत नागरिकांनी तसेच विद्युत ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार करून देखील लक्ष दिले जात नसल्याने नाराजी असल्याचे निदर्शनास आले आहे.

तालुक्यात कुठे विजेची खांब वाकलेली आहे तर कुठे विजेच्या तारा जीर्ण झाल्या आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या या तारांना लागून शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नसुन , काही ठीकाणी विद्युत तारांना घोळ पडलेला आहे. तर कुठे मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीच्या चिमण्या तुटल्या आहेत. एवढी धोकादायक कामे ही पावसाळा पूर्वी करावयाची असताना देखील तशीच आहे

शेतात वास्तव्यास असलेल्या शेतकरी वर्गाच्या घरांसमोर विद्युत खांब वाकलेले आहे. त्या खांबावरून घरासाठी विद्युत प्रवाह करणार्‍या तारा वाकलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. अशा धोकादायक कांमामुळे मोठा धोका निर्माण होऊन जीवित हानीची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्युत खांब व तारा या शेतांमधून गेलेल्या असताना पावसाळ्यात शेतकरी वर्गाची पेरणी व इतर कामे करताना याचा मोठा धोका पोहचवू शकतो. प्रसंगी जीवित हानीची सुद्धा दाट शक्यता आहे.

त्याचप्रमाणे शेतामध्ये जनावरांचे गोठे असून त्या गोठ्या वरून काही विद्युत तारा गेल्या असल्याने त्यांची व्यवस्थित बांधणी केली पाहिजे पी. व्ही. सी. अथवा वायरचे आवरण देऊन धोका टाळला पाहिजे नाही तर जीर्ण झालेली तार गोठ्यावर तुटून गुरे दगावण्याची जास्त भीती आहे. काही विद्युत तारा ह्या उसाच्या शेतातून गेल्या आहे व ऊस पीक हे तारांचे उंची पर्यंत जाऊ शकते. तेथे ही शॉर्ट सर्किट होऊन ऊस पीक जळण्याची भीती आहे .

माझ्या शेतातील बादांवरील पोल अनेक दिवसांपासुन तुटून पडला आहे. तारांना झोळ पडला आहे. काही विपरीत घटना घडल्यास यास यास जवाबदार कोण ? प्रशासनाने दखल घ्यावी.

बाळासाहेब गांगुर्डे ,माजी सैनिक, पाळे खुर्द

जीर्ण झालेले पोल तुटलेल्या तारांचा झोळ संदर्भात वारंवार तक्रार करूनही तारा व वाकलेले पोल तसेच आहेत तात्काळ दुरुस्त करावी.

किरण पाटील, शेतकरी, पाळे खुर्द

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com