झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी

झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी

नवीन नाशिक । प्रतिनिधी Navin Nashik

सिटी सेंटर मॉल (City Center Mall) सिग्नलवरील भिकारी (Beggar), खेळण्यांसह विविध वस्तू विक्रेते आणि त्यांनी फुटपाथवर थाटलेल्या झोपड्या (Huts) हटवाव्यात, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. शिवसेना (Shiv Sena), सत्कार्य फाऊंडेशनच्या (Satkarya Foundation) पुढाकाराने याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) आणि नवीन नाशिक विभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले.

सिटी सेंटर जवळील सिग्नलच्या पुलाजवळ खेळणी विक्रेते (Toy sellers) व भिकारी यांनी फुटपाथवरच झोपड्या थाटल्या आहेत. रस्त्यावरच ते शौचाला जातात, अंघोळ करतात, कचर्‍याचे ढिग (Garbage piles) निर्माण करतात, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रोगराई निर्माण होण्याचा धोका आहे. त्यांच्यात जोरदार भांडणही होते. वस्तू विकण्यासाठी आणि मुलांना कडेवर घेवून भीक मागण्यासाठी या व्यक्ती वाहने अडवितात.

यामुळे अपघात होण्याची व वाहनधारक दोष नसताना अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे भिकारी व विक्रेते बर्‍याचदा रात्री व दिवसा परिसरातील गल्ल्यांमधून घरांसमोर फिरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परिसरातील सुरक्षा, स्वच्छता (Hygiene) आणि अतिक्रमणमुक्त (Encrochment) फुटपाथसाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तिडकेनगर, प्रियंका पार्क, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, दोंदे पूल परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

शिवसेना आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयुक्त कैलास जाधव, विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, चारूशिला गायकवाड, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, डॉ. राजाराम चोपडे, मनोज पाटील यांच्यासह रहिवाशांच्या स्वाक्षरी आहेत.

Related Stories

No stories found.