
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने ( Smart City Company Nashik)रामकुंडातील ( Ramkunda)काँक्रीट काढण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीने निरी व भूगर्भ सर्व्हेक्षण विभाग यांच्या सल्ल्याने रामकुंडातील कॉक्रीट काढण्याची सूचना केली होती. यामुळे स्मार्ट सिटीने कोणतेही कारण पुढे न करता रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी निवेदनाद्वारे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी स्मार्ट सिटी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्याकडे केली आहे.
स्मार्ट सिटीकडून गोदाघाट परिसरात विकासकामे केली जात आहेत. 2002-03 च्या कुंभमेळा दरम्यान विकासकामे करताना गोदावरी नदी पात्रात सरसकट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यामुळे गोदावरीत येणार्या जलस्त्रोतांचा श्वास कोंडला गेला होता. हे काँक्रिटीकरण काढण्यासाठी देवांग जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने आदेशित केले होते.
नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदापात्रातील तळ काँक्रीट काढण्याच्या कामाला सुरुवात केली. रामकुंडातील काँक्रीट काढण्यासाठी स्मार्ट कार्य केले पाहिजे. सिटीने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने निर्णय घेतला आहे की, केंद्रीय संस्था निरी आणि भूगर्भ सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) यांच्या सल्ल्याने रामकुंडातील कॉक्रीट काढण्यात यावे. कार्यवाही करून लवकरात लवकर रामकुंडातील तळ सिमेंट काँक्रीट काढले पाहिजे, अशी मागणी जानी यांनी केली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आठ या दिवसांपूर्वी रामकुंडातील कॉक्रीट काढण्याचे आदेश स्मार्ट सिटी सीईओ यांना दिलेले आहे.