कडवा कालव्याला पाणी सोडावे

कडवा कालव्याला पाणी सोडावे
देशदूत न्यूज अपडेट

सायखेडा | प्रतिनिधी | Saykheda

निफाड-सिन्नर सरहद्दीवरील भेंडाळी, महाजनपूर, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, सोनगाव, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे परिसरात रिमझिम पाऊस सुरू असला तरी अद्यापही नद्या, नाले, छोटे ओहळ, विहिरी कोरडेठाक आहे...

त्यामुळे परिसराला जीवनदान ठरलेल्या कडवा कालव्याला (Kadwa canal) पाणी सोडावे अशी मागणी भेंडाळीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब कमानकर, ग्रामपंचायत सदस्य शरद खालकर, गणेश मोगल आदींसह शेतकर्‍यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar), जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे केली आहे.

कर्ज काढून शेतकर्‍यांनी भांडवल उभे केले ते पूर्ण पिकांसाठी खर्च केले. तर रिमझिम पावसामुळे पुढील खरीप हंगाम देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धरणे जवळपास 80 टक्के भरले आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कोठा आरक्षित ठेवून उर्वरित पाणी कडवा कालव्याद्वारे सोडून परिसरातील नदी, नाले, वळण बंधारे या पाण्याने भरून द्यावे अशी मागणी शरद खालकर, गणेश मोगल, सोमनाथ दशरथ खालकर, गणेश शिंदे, जयवंत सातपुते, संतोष खालकर, मधूकर आढाव, बाळासाहेब खालकर, शशिकांत खालकर, कांतीलाल खालकर, संदीप सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते, दीपक शिंदे, बबन कमानकर,शिंदे, सागर खालकर, गोकुळ खालकर, संतोष कमानकर, बबन शिंदे आदींसह शेतकर्‍यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com